![]()
पोलिस भरतीत अवघ्या दोन गुणांनी अपयश आल्याने एका २० वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतीक्षा शिवाजी सुरुडे (२०, रा. उभाडे, ता. इगतपुरी) असे या मृत तरुणीचे नाव आहे. वर्दी मिळवून घरची परिस्थिती सुधारण्याचे तिचे स्वप्न होते, मात्र नियतीने दोन गुणांच्या अंतराने घात केला. प्रतीक्षा ही गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस भरतीसाठी कठोर परिश्रम घेत होती. नुकत्याच नाशिक येथे झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत खुल्या प्रवर्गाचे मेरिट १२७ गुणांवर थांबले होते. प्रतीक्षाला १२५ गुण मिळाले होते. अवघ्या दोन गुणांनी वर्दी हुकल्याचा धक्का तिला सहन झाला नाही. शनिवारी (दि. ११) सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिने राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. जिद्दी स्वभावाचा असा अंत प्रतीक्षा अत्यंत मेहनती आणि जिद्दी होती. पोलिस दलात भरती होऊन कुटुंबाचा आधार बनण्याचे तिचे ध्येय होते. दोन गुणांच्या फरकाने तिला मानसिक नैराश्यात लोटले. याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण धकाटे तपास करत आहेत. अशा प्रकारे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये पोलिस भरतीत केवळ दोन मार्क कमी मिळाले म्हणून तिने हे पाऊल उचलले आहे. स्पर्धा परीक्षेत यश-अपयश येतच असते. एकदा अपयश आले तर दुसऱ्यांदा जिद्दीने प्रयत्न करून यश मिळवता येते. विद्यार्थ्यांनी असा टोकाचा विचार करू नये. – योगेश सुरुडे, (मृत मुलीचे चुलते)
Source link
खाकीचे स्वप्न 2 मार्कांनी हुकले; तरुणीची आत्महत्या:नाशिकच्या घोटीमधील घटना, मिळाले 125 गुण