पालखी सोहळ्याच्या तोंडावर अकलूजमध्ये पाणी टंचाई:15 जुलैपर्यंत टँकरद्वारे पुरवठा, अल निनोच्या इशाऱ्यामुळे कालव्याचे पाणी बंद, साठवण तलाव कोरडा
हवामान खात्याने अल निनो बाबत आगाऊ सूचना देऊन कमी पर्जन्यमानाचा अंदाज दिला, मात्र तोपर्यंत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणे रिकामी झाल्याने पालखी सोहळ्याच्या तोंडावर पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून अकलूज शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आता चक्क टँकरने पाणी पुरवठा करण्यास नगर परिषदेने सुरुवात केली आहे. शहरातील जुने बोअर सुरू करण्याच्या हालचाली युद्ध पातळीवर सुरू झाल्या…