Headlines

विठ्ठल मंदिर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित:जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आदेश; आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई होणार‎



आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर शहरातील यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३४ (ब) नुसार मंदिर परिसर ‘वाहन प्रतिबंध क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष ए

.

​आषाढी यात्रा कालावधीत श्रीकृष्ण मंदिर, चौफाळा, विठ्ठल मंदिर पश्चिम द्वार आणि महाद्वार चौक परिसरात भाविकांची अलोट गर्दी असते. भाविक येथूनच दर्शनरांगेकडे आणि मंदिराकडे पायी जातात. अशा वेळी प्रदक्षिणा मार्गावर आणि इतर ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केल्यास भाविकांना चालणे कठीण होते. तसेच वाहनांमुळे अपघात घडण्याची शक्यता असते आणि वाहतूक कोंडी निर्माण होऊन प्रशासनाला गर्दीचे व्यवस्थापन करणे अवघड जाते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. ​. वारीसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पंढरपूर नगर परिषदेमार्फत स्वतंत्र पार्किंगची सोय केली जाईल. मंदिर परिसरात राहणाऱ्यांनी व काम करणाऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडून पास मिळवणे आवश्यक आहे. पासधारकांनाही ठरवून दिलेल्या जागेतच वाहन पार्क करावे लागेल. . माल ने-आण साठी व्यावसायिकांनी पोलिस प्रशासनाशी चर्चा करून, भाविकांना त्रास होणार नाही, अशी वेळ ठरवावी. ​पात्र आणि दिव्यांगांना श्रीकृष्ण मंदिर व चौफाळ्यापासून ने- आण करण्यासाठी समिती पर्यावरणपूरक वाहनांची व्यवस्था करणार. ​या परिसरात सर्व प्रकारच्या दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांना प्रवासासाठी तसेच पार्किंगसाठी पूर्णपणे मनाई आहे. . मंदिर परिसरात राहणारे नागरिक कर्मचाऱ्यांच्या प्रशासनाकडून पास मिळाल्यानंतरच या आदेशातून सूट दिली जाईल. . ०१ ते १५ जुलै या दरम्यान पंढरपूर शहरातील श्रीकृष्ण मंदिर, चौफाळा ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पश्चिमद्वार, मंदिर परिसर ते महाद्वार चौक परिसरात सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहनांना बंदी असेल. . १५ जुलै ते २९ जुलै. या काळात हा संपूर्ण परिसर २४ तास वाहन प्रतिबंध क्षेत्र म्हणून लागू राहील.

स्वतंत्र पार्किंग, पर्यावरणपूरक वाहन सुविधा

पासधारकांनाच प्रवेश



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *