Headlines

पालखी सोहळ्याच्या तोंडावर अकलूजमध्ये पाणी टंचाई:15 जुलैपर्यंत टँकरद्वारे पुरवठा, अल निनोच्या इशाऱ्यामुळे कालव्याचे पाणी बंद, साठवण तलाव कोरडा‎




हवामान खात्याने अल निनो बाबत आगाऊ सूचना देऊन कमी पर्जन्यमानाचा अंदाज दिला, मात्र तोपर्यंत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणे रिकामी झाल्याने पालखी सोहळ्याच्या तोंडावर पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून अकलूज शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी आता चक्क टँकरने पाणी पुरवठा करण्यास नगर परिषदेने सुरुवात केली आहे. शहरातील जुने बोअर सुरू करण्याच्या हालचाली युद्ध पातळीवर सुरू झाल्या आहेत. तर खाजगी बोअर वाल्यांनाही त्यांचे बोअर इतर नागरिकांसाठी खुले करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकलूज शहराला नीरा नदीवरील वीर धरणातून पिण्याचे पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी विझोरी येथे साठवण तलाव केला आहे. या तलावातून अकलूज बरोबरच यशवंतनगर व संग्राम नगर या दोन्ही गावांनाही पाणीपुरवठा केला जातो. मात्र या साठवण तलावातून पाण्याची गळती होत असल्याने व पाऊस येईल या भरोशावर या तलावातील काही भागाचे खोदाईचे काम सुरू असून काही भागात पाणी साठवण केले जात असतानाचा अल निनोच्या पार्श्वभूमीवर शासनाने पाणी वाटपात हात आखडता घेत दिनांक १३ जून रोजी पाणी वाटप संबंधीचा आदेश करताच नीरा उजवा कालव्यातील पाणी वाटप बंद करण्यात आले. नगर परिषदेने उपलब्ध पाणी पाहता १५ दिवसांनी पाणी वाटप करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानुसार ही पाणी वाटप शक्य राहिले नसल्याने व आता तलावात पाणी नाही, शिवाय पाटबंधारे विभाग पाणी सोडत नाही, त्यामुळे नगरपरिषदेने टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे. स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना ^पाणी २१ तारीखेपर्यंत येणार नसल्याच्या अफवा शहरात पसरल्या आहेत. मात्र दिनांक १२ जुलै पर्यंत पाणी तलावात येईल व जास्तीत जास्त दिनांक १५ जुलै पर्यंत नियमित पाणी पुरवठा सुरू होईल असा विश्वास आहे. कूपनलिकांच्या पाण्यात क्षार असण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी हे पाणी पिण्यासाठी वापरताना तुरटीचा वापर करावा. तसेच खाजगी कूपनलिका असणाऱ्यांनी ही आपल्या कूपनलिका सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या कराव्यात. सचिन पाटील, मुख्याधिकारी, नगर परिषद अकलूज त्यानुसार शहरातील ४६ पैकी सुरू असणाऱ्या ३४ कूपनलिकाची दुरुस्ती केली असून त्यावर सध्या ८ टँकरने पाणी भरून पाणी पुरवठा गुरुवार दि. २ जुलै पासून सुरू केला आहे. ज्या नागरिकांना पाण्याची गरज आहे त्यांनी नगर परिषदेकडे नोंद केल्यास त्यांना व त्या भागाला पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय उर्वरित १२ कूपनलिका दुरुस्तीचे काम ही युद्ध पातळीवर सुरू केले आहे. सध्या ८ टँकरने पाणी भरून पाणी पुरवठा गुरुवार दि. २ जुलै पासून सुरू केला आहे. शिवाय काही कूपनलिकांवर खुल्या तोट्या बसवून ही पाण्याची सोय केली आहे. ही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकाच रात्री १९ कूपनलिका खोदल्या होत्या, त्या आज कामी आल्याचे संग्राम नगर येथील रहिवाशी बबनराव शेंडगे यांनी सांगितले. ^अकलूज मध्ये आमचा मसाला भात विक्रीचा व्यवसाय असून त्यासाठी पाणी मुबलक लागते, आता पाणी नसल्याने आम्हाला ग्राहकांसाठी पाण्याचे जार घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी रोज १०० रुपये शिवाय नगर परिषदेचे ५० असा रोजचा १५० रुपये खर्च वाढणार आहे. हुसेन मुलाणी, व्यावसायिक, अकलूज अकलूजमध्ये दि. १९ जुलै रोजी संत तुकाराम महाराज व संत सोपान काका महाराज तसेच संत गोरोबा कुंभार यासह छोटे मोठे १५ पालखी सोहळे व त्याबरोबरच सुमारे दोन लाख भाविक मुक्कामी असतात. त्यामुळे या भाविकांच्या पाण्याचे नियोजनाचा ही प्रश्न आहे. दरम्यान गोरगरीब नागरिकांकडे पाणी साठवणीसाठीचे पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांचेसमोर अजून १२/१३ दिवस कसे काढायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. १९ कूपनलिका ठरताहेत वरदान १२ जुलैपर्यंत पाणी तलावात येईल २ लाख भाविकांच्या पाण्याचे मोठे आव्हान



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *