Headlines

Admin

छत्रपती संभाजीनगरात FDA चा दणका:तब्बल 2.93 कोटींचे संशयित खाद्यतेल जप्त; 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

‘सेफ फूड-सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी धडक कारवाई केली आहे. अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यतेलाचे रिपॅकिंग करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, या ठिकाणाहून तब्बल २ कोटी ९३ लाख रुपयांचा संशयित निकृष्ट तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून यामुळे खळबळ उडाली आहे. नेमकी कारवाई कुठे…

Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या गोहत्या बंदीच्या आदेशाला स्थगिती:म्हटले – यात सुधारणा करण्याची गरज, मद्रास न्यायालयाने म्हटले होते- ही इस्लाममधील आवश्यक प्रथा नाही

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाच्या त्या आदेशाला स्थगिती दिली, ज्यात तामिळनाडू सरकारला बकरी ईद किंवा इतर कोणत्याही दिवशी राज्यात गायी आणि वासरांच्या हत्येवर बंदी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, या आदेशात सुधारणा करण्याची गरज आहे. राज्य सरकारने मद्रास उच्च न्यायालयाच्या २७ मे च्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचिकेत…

Read More

कुटुंबासोबत लंडनमध्ये सुट्टीवर दिसली प्रियंका चोप्रा:मुलगी मालतीने आईच्या केसांतील क्लिप्स काढल्या; विम्बल्डन पाहण्यासाठीही पोहोचली, फोटो पहा

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा सध्या आपल्या कुटुंबासोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. प्रियंकाने सोशल मीडियावर या ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची मुलगी मालती मेरी आणि पती निक जोनास देखील दिसत आहेत. या पोस्टमधील एका खास व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामध्ये छोटी मालती तिच्या आईच्या केसांमधून पिन काढताना दिसत…

Read More

मुलीला थप्पड मारल्याने मित्राची हत्या:कारागृहातून पळून जयपूरला आले 3 गुंड, मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करत होते

जयपूरमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान गुंडांनी चाकूने भोसकून आपल्याच मित्राची हत्या केली. आरोपी भरतपूरच्या खुल्या कारागृहातून पळून जयपूरला आले होते. मानसरोवर मेट्रो स्टेशनजवळच्या एका क्लबमध्ये ते वाढदिवसाची पार्टी करत होते. रात्री सुमारे 2:30 वाजता कोणत्यातरी कारणावरून गटातील एका मुलीला एका गुंडाने थप्पड मारली. यावरून वाद झाला. काही गुंडांनी आपल्याच साथीदारावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्यांनी जखमीला जयपूरिया…

Read More

पंजाबमध्ये खासगी शाळांविरुद्ध कायदा बनला:वार्षिक शुल्क वाढीची मर्यादा निश्चित; यापेक्षा जास्त वाढल्यास मान्यता रद्द, ₹5 लाखांपर्यंत दंड

पंजाबमधील खासगी शाळा आता मनमानीपणे शुल्क वाढवू शकणार नाहीत. मंगळवारी राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी सरकारच्या अध्यादेशाला मंजुरी दिली. हा कायदा लागू होताच, खासगी शाळांसाठी वार्षिक शुल्क वाढीची मर्यादा ५% निश्चित करण्यात आली आहे. नियम मोडल्यास ५ लाख रुपयांपर्यंत दंड आणि वारंवार उल्लंघन केल्यास शाळेची मान्यताही रद्द केली जाऊ शकते. अध्यादेशाला मंजुरी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री भगवंत मान…

Read More

Sanjay Shirsat Clarifies 92 Lakh Beneficiary Cut

राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून 92 लाख लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आल्याच्या चर्चेदरम्यान शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ही योजना बंद होणार नसून केवळ अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून कमी के . ‘लाडकी बहीण योजना सुरूच राहणार’ लाडकी बहीण योजनेतून मोठ्या प्रमाणावर नावे कमी केल्याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की,…

Read More

उपमहापौर ट्रॅफिकला वैतागले!:राणी बागेतील रिकाम्या बंगल्यासाठी संजय घाडी यांचे पालिका आयुक्तांना पत्र

मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी दैनंदिन प्रवासाचा त्रास कमी करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांकडे विशेष मागणी केली आहे. दहिसर (पूर्व) येथून दक्षिण मुंबईतील महापालिका मुख्यालयापर्यंत दररोज प्रवास करताना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई उद्यान परिसरातील रिकामा शासकीय बंगला राहण्यासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे. दहिसरच्या प्रवासाचा मनस्ताप…

Read More

हिंगोलीत काळाचा घाला:कयाधू नदीपात्रात बैलजोडी धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून करुण अंत

हिंगोली तालु्क्यातील घोटा शिवारात कयाधू नदीच्या पात्रात बैलजोडी धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची घटना रविवारी ता. 12 रात्री उघडकीस आली आहे. दोघांवर शोकाकुल वातावरणात घोटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेमुळे घोटा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटा…

Read More

गर्लफ्रेंडसोबत ऋषिकेशला फिरायला आलेल्या युवकांची लोकांना मारहाण:अर्धनग्न होऊन थारवर दारू पीत होते; टोकल्यावर लाथा-दगड मारले

ऋषिकेशमध्ये दिल्लीहून गर्लफ्रेंडसोबत वीकेंडला फिरायला आलेल्या तरुणांनी दारूच्या नशेत स्थानिक लोकांशी मारामारी केली. हे सर्वजण काळ्या रंगाच्या थार गाडीवर बसून दारू पीत होते आणि शिवीगाळ करत होते. याच दरम्यान एक तरुण अर्धनग्न होऊन आक्षेपार्ह कृत्ये करत होता. तिथून जाणाऱ्या महिला आणि स्थानिक लोकांनी त्यांना असे करण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांनी पार्किंग कर्मचाऱ्याकडे याची तक्रार केली. कर्मचाऱ्याने…

Read More

विदर्भात सरासरीपेक्षा 27 टक्के कमी पाऊस:गडचिरोलीत सर्वाधिक घट, तर गोंदियात सरासरी ओलांडली, 11 पैकी 10 जिल्हे 'कोरडे

जून महिन्याच्या सुरुवातीपासून ते जुलैच्या मध्यापर्यंत विदर्भातील पावसाची आकडेवारी समोर आली आहे. हवामान विभागाने 1 जून ते 13 जुलै 202६ या कालावधीसाठी जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, विदर्भात सरासरीच्या तुलनेत 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. या दीड महिन्याच्या काळात विदर्भात सामान्यतः 299 मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ 218.9 मिमी पाऊस पडला आहे. यामुळे…

Read More