चंद्रपुरात नर वाघाचा संशयास्पद मृत्यू:अवयव शाबूत, तरीही मृत्यूचे कारण गूढ; वर्षभरात 42 वाघांचा बळी
चंद्रपूर वनविभागाच्या सावली परिक्षेत्रातील बिगर वनक्षेत्रात एका ६ ते ७ वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आला आहे. सावली तालुक्यातील मूल येथील चिकली चक क्रमांक २ मधील सर्व्हे नंबर ७८ च्या परिसरात हा मृतदेह आढळल्याने वनवर्तुळात खळबळ उडाली आहे. या वाघाचा मृत्यू अत्यंत संशयास्पद मानला जात आहे. ३० जून २०२६ रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास…