चोपड्यात वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचा मध्यरात्री रस्ता रोको:शिरपूर-चोपडा मार्गावर दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
शिरपूर तालुक्यातील बभळाज, तरडी व हिसाळे, अजनाड बगला परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर वीजपुरवठा मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रविवारी मध्यरात्री बभलाज येथील महावितरण कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे शिरपूर-चोपडा मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन दोन्ही बाजूंना सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कृषी पंपांसाठी रात्री 9 वाजता वीजपुरवठा सुरू होणे अपेक्षित असताना…