Headlines

Admin

पारडा शिवारातील आखाड्यावर पती-पत्नीचा संशयास्पद मृ्त्यू:खूनाचा संशय, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी

हिंगोली तालु्क्यातील पारडा शिवारातील आखाड्यावर पती-पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता. २० दुपारी उघडकीस आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून सदर दांम्पत्याचा खून झाला असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी काही जणांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पारडा येथे बळीराम देवबा वाघमारे (६५) त्यांची…

Read More

'आप' देणार मंत्री चंद्रकांत पाटलांना पंजाबचे विमानाचे तिकीट:पुणे मनपा शाळा खाजगीकरण वादात 'आप'ची अनोखी मागणी

पुणे महानगरपालिकेच्या शाळांच्या खाजगीकरणाच्या मुद्द्यावरून सध्या वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने (आप) एक अनोखे आंदोलन जाहीर केले आहे. ‘आप’ने महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पंजाबचे विमानाचे तिकीट भेट देण्याचे ठरवले आहे. येत्या सोमवारी, २२ जून २०२६ रोजी ‘आप’चे पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील कार्यालयात…

Read More

माहिती अधिकार हा पैसे कमावण्याचे साधन नाही:RTIमधील बदलांवर अण्णा हजारे संतप्त; फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा

देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात माहिती अधिकार (RTI) कायदा लागू व्हावा यासाठी ऐतिहासिक संघर्ष करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या नव्या धोरणांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने नुकतेच एक राजपत्र प्रसिद्ध करून माहिती अधिकार कायद्याच्या नियमांमध्ये अत्यंत जाचक आणि महागडे बदल केले आहेत. या बदलांमुळे माहिती अधिकार कायदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची…

Read More

पुण्यात निवृत्त ACP कडून सुनेचा छळ:डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा; नवीन कायद्यामुळे कारवाईत अडचण

पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये एका ३० वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून छळ झाल्याची तक्रार २० जून २०२६ रोजी उघडकीस आली आहे. पीडितेच्या सासरच्या मंडळींमध्ये निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) यांचा समावेश आहे. फिर्यादीचा विवाह २०२२ मध्ये झाला होता. लग्नाच्या वेळी पीडितेच्या आई-वडिलांनी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि लग्नाचा सर्व खर्च केला होता. तरीही, पती, सासू,…

Read More

नसरापूर चिमुकली अत्याचार-खून: 25 जूनला निकाल:महाराष्ट्रातील सर्वात वेगवान खटला ठरण्याची शक्यता

नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणाचा अंतिम निकाल येत्या २५ जून २०२६ रोजी जाहीर होणार आहे. हा खटला महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात जलदगतीने चालविलेला खटला ठरण्याची दाट शक्यता आहे, कारण अवघ्या एका महिन्याच्या आतच या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल समोर येत आहे. केवळ एका महिन्यात निकाल; जलदगतीचा नवा विक्रम या संवेदनशील…

Read More

मोदी म्हणाले- बंगालला पाकिस्तानचा भाग बनवण्याचा प्रयत्न झाला:धार्मिक अजेंडा राबवला गेला, घुसखोरांकडून ताबा मिळवला गेला; आता कायद्याचे राज्य

पश्चिम बंगालमधील हुगळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जेव्हा संपूर्ण बंगालला पाकिस्तानचा भाग बनवण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा काँग्रेस त्या षडयंत्रकर्त्यांसमोर गुडघे टेकून उभी होती. बंगालचा आवाज धार्मिक अजेंड्यांनी दाबला जात असताना डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी प्रस्ताव मंजूर केला आणि घोषणा केली की, संपूर्ण बंगाल पाकिस्तानचा भाग बनणार नाही. मोदी म्हणाले – जो बंगाल…

Read More

मोटोरोला एज 70 फ्युजनचे नवीन व्हेरिएंट लॉन्च:स्मार्टफोनमध्ये 50MP सोनी कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी, मिलिटरी ग्रेड बॉडीसह IP69 संरक्षण

टेक कंपनी मोटोरोलाने मार्चमध्ये एज 70 फ्युजन लॉन्च केले होते, आज कंपनीने त्याचे 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेले नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. हा फोन 50MP सोनी कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 7s जेन 4 प्रोसेसर आणि 7000mAh बॅटरीसह येतो. तसेच, यात मिलिटरी ग्रेड बॉडीसह IP69 प्रोटेक्शन देखील मिळेल. याची किंमत 36,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोन…

Read More

भय्याजी जोशी: 'कौशिक आश्रम' कर्तव्यपूर्तीचे केंद्र:संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांसाठी पुनर्निर्मित वास्तू

घरातील ज्येष्ठ मंडळींची विशिष्ट वयानंतर आपण जी सेवा करतो, ती सेवा नसते, तर ते कर्तव्य असते. ‘कौशिक आश्रम’ हे देखील संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांची सेवा करणारे कर्तव्यपूर्तीचे केंद्र आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी यांनी शनिवारी केले. पुण्यातील मित्रमंडळ सोसायटीमध्ये असलेल्या ‘कौशिक आश्रम’ या वास्तूच्या पुनर्निर्माणानिमित्त आयोजित ‘कृतज्ञता सत्कार कार्यक्रमा’त जोशी…

Read More

Mumbai BEST Strike Halts NEET Exams; Protesting Workers Get MESMA Notice

मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या ‘बेस्ट’ बसच्या कर्मचाऱ्यांचा संप शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही मिटू शकलेला नाही. रविवार, २१ जून रोजी होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (NEET) पार्श्वभूमीवर हा संप सुरूच राहिल्याने . परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी तातडीची बैठक घेऊनही यातून कोणताही मार्ग न निघाल्याने मुंबईकरांचे हाल आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान…

Read More

ओबीसी जनगणना झालीच पाहिजे:जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम द्या, विजय वडेट्टीवार यांची मागणी; आंदोलनाचा दिला इशारा

ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या देशासमोर यावी यासाठी होणाऱ्या जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलमचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. केंद्र सरकारने ओबीसी जनगणनेची घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष जनगणना प्रक्रियेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच नसल्याने सरकारच्या भूमिकेबाबत गंभीर शंका निर्माण होत आहेत. ओबीसी समाजाची खरी संख्या दडविण्याचा हा प्रयत्न असून तो हाणून पाडण्यासाठी राज्यभर व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, अशी…

Read More