Headlines

Admin

रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी योगाभ्यास आवश्यक:मोटर वाहन निरीक्षक वसंत कलंबरकर यांचे प्रतिपादन, दिव्य मराठीशी साधला संवाद

रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सुरक्षित वाहन चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी योगसाधना अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन मोटर वाहन निरीक्षक तथा योगशास्त्री वसंत कलंबरकर यांनी दिव्य मराठीशी बोलतांना केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने बोलतांना त्यांनी ‘योगिक प्रक्रिया, रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षमता’ या लेखातून त्यांनी योग आणि वाहन चालक यांचा थेट संबंध स्पष्ट केला आहे. रस्ता…

Read More

20-20 वर्षे निकाल न लागणे हाही अन्यायच!:पवनराजे हत्याकांड निकालावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया, ओमराजे निंबाळकरांच्या पक्षांतरावरही सूचक विधान

राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले, अशी…

Read More

रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना:छत्रपती संभाजीनगरचे 5 पर्यटक समुद्रात बुडाले, शोधमोहीम सुरू

वीकेंडचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे आलेल्या पर्यटकांवर आज, शनिवारी (दि. 20 जून) काळाने घाला घातला. येथील प्रसिद्ध श्री देव गणपतीचे दर्शन घेऊन समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील पर्यटकांपैकी 5 जण समुद्राच्या पाण्याचा आणि लाटांचा अंदाज न आल्याने बुडाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. हे पाचही जण सध्या…

Read More

पवनराजे हत्याकांडातील सीबीआय कोर्टाचे 10 सर्वात मोठे खुलासे:माफीचा साक्षीदार अविश्वसनीय, मोबाईलचे सीडीआर गायब, अन् पोलिसांच्या घोडचुका

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर २० वर्षांनंतर निकाल लागला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआय (CBI) कोर्टाने आपला ऐतिहासिक निकाल देताना तपास…

Read More

पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार:ओमराजे निंबाळकर म्हणाले – शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय झाला नाही, मतदार संघात जावून लोकांशी चर्चा करून निर्णय घेणार

पवनराजे हत्याकांड्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. ओमराजे म्हणाले की, सध्या कलियुग आहे. कलियुगात वाईटाला चांगले बळ असते. चांगल्याला लवकर यश मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच…

Read More

आता एकच शिवसेना, ती म्हणजे एकनाथ शिंदेंची!:कोल्हापूर दौऱ्यात अमित शहांचा टोला; महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून आज त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्याचे भूमिपूजन केले आहे. यावेळी त्यांनी मंदिराच्या विकासाविषयी महत्त्वाची माहिती दिली. याचसोबत भाषणाच्या सुरुवातीला शिवसेनेच्या खासदारांच्या फुटीवरून टोला देखील लगावला आहे. आता एकच शिवसेना राहिली आहे आणि ती म्हणजे एकनाथ शिंदे यांची, असे त्यांनी म्हटले आहे. अमित शहा…

Read More

कारची काच फोडून 10 लाख पळवणारी आंतरराज्य टोळी गजाआड:हिंगोली गुन्हे शाखेची आंध्रप्रदेशात धडक कारवाई

वसमत शहरात वडिलांच्या ऑपरेशनसाठी बँकेतून काढलेली दहा लाख रुपयांची रोकड कारची काच फोडून लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून आंध्र प्रदेशातील दोन आरोपींना त्यांच्या मूळ गावावरून शनिवारी ता. 20 अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. 11 दिवसांत तब्बल 70 ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून…

Read More

विठुरायाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज:आषाढी यात्रेसाठी धावणार 5,500 विशेष गाड्या; गावांतून थेट पंढरपूरसाठी बस मिळण्याची सोय

“ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामस्मरणात पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी ५ हजार ५०० विशेष बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी एकत्रित मागणी…

Read More

आमिर खान गौरी स्प्रॅटसोबत रजिस्टर्ड मॅरेज करणार:जवळचे मित्र-नातेवाईक उपस्थित राहतील, कामातून ब्रेक घेतला; म्हटले – हे खासगी ठेवू इच्छितो

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, वयाच्या 61 व्या वर्षी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत तिसरे लग्न करणार आहेत. हे लग्न 5 जुलै रोजी होणार आहे, ज्यात आमिर आणि गौरीच्या काही नातेवाईकांव्यतिरिक्त फक्त जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. लग्नासाठी आमिर खान चित्रपटांमधून ब्रेक घेणार आहेत. लग्नाबद्दल बोलताना आमिर खानने डेक्कन क्रॉनिकलला सांगितले, “हे घरी होणारे एक अत्यंत साधे नोंदणीकृत…

Read More

हरिद्वारमध्ये विराजमान झाले 5210 किलोचे पारदेश्वर महादेव:आयोजक म्हणाले- जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग; प्राणप्रतिष्ठेसाठी जनसागर उसळला

हरिद्वारमध्ये ‘पारदेश्वर महादेव’ यांच्या प्राणप्रतिष्ठेसोबत ५२१० किलो वजनाचे पारद शिवलिंग स्थापित करण्यात आले. आयोजकांनी याला जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग असल्याचे सांगितले आहे. या प्रसंगी संत, भाविक, लोकप्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींची मोठी गर्दी उसळली होती. हरिद्वार-रुडकी महामार्गावरील श्री साईं शिव गंगा धाममध्ये अधिक मासाच्या शुक्ल पक्ष तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर वैदिक मंत्रोच्चार आणि संत-महात्म्यांच्या सान्निध्यात हा…

Read More