Headlines

री-नीटचा निकाल योग्य असल्याचे सिद्ध:4 विद्यार्थ्यांना खंडपीठाचा दंड, पाहणीत मूळ उत्तरपत्रिका अन् एनटीएचे गुण तंतोतंत जुळले




राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) घेतलेल्या री-नीटच्या गुणपत्रात फेरफार आणि निकालात त्रुटी असल्याचा दावा करणाऱ्या ४ विद्यार्थ्यांचे आरोप बिनबुडाचे आणि चुकीच्या माहितीच्या आधारे असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्या. आबासाहेब शिंदे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांच्या ४ याचिका फेटाळून लावल्या. त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठाने प्रत्येक याचिकाकर्त्याला ५,००० रुपये दंडात्मक खर्च ठोठावला आहे. निकालाविरोधात ४ विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार व एनटीएच्या विरोधात याचिका दाखल केल्या होत्या. खंडपीठाने थेट दिल्लीहून त्यांच्या मूळ उत्तरपत्रिका सीलबंद पाकिटात मागवल्या. सरकार व एनटीएच्या बाजूने डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया ॲड. अजय तल्हार, वरिष्ठ पॅनल कौन्सिल ॲड. रोहित सर्वज्ञ यांनी युक्तिवाद केला. उत्तरपत्रिकेच्या पाहणीमुळे न्यायालयात चलाखी उघड न्यायमूर्तींनी न्यायालयातच सीलबंद पाकिटे उघडून मूळ उत्तरपत्रिकांची पाहणी केली. संबंधित विद्यार्थी, त्यांचे पालक व वकिलांना या उत्तरपत्रिका दाखवल्या. त्या वेळी एनटीएने दिलेले गुण व मूळ उत्तरपत्रिकेतील उत्तरे तंतोतंत जुळत असल्याचे स्पष्ट झाले. निकाल पूर्णपणे अचूक असून, विद्यार्थ्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे उघडकीस आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *