Headlines

Admin

धर्मांतर रॅकेट:हवाई दलातील जवानाच्या पत्नीवरील अत्याचारातील फरार मौलाना अटकेत

हवाई दलातील जवानाच्या पत्नीवर झालेल्या अत्याचार आणि सक्तीच्या निकाह प्रकरणातील तिसरा मुख्य आरोपी मौलाना मेहमूद मकसद याला सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अटक टाळण्यासाठी आरोपी मौलाना स्वतःहून पोलिसांना शरण आला असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मध्य प्रदेशातील तामिया येथील रहिवासी मौलाना मेहमूद मकसद गुन्ह्याची तक्रार दाखल झाल्यापासून फरार होता. नागपूर पोलिसांचे विशेष…

Read More

दिव्य मराठी ब्रेकिंग‎:भाेंदू अशाेक खरातला ईडीचा दुसरा धक्का; शिर्डी, कोपरगाव, संगमनेरमध्ये छापेमारी, बड्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले

भोंदू अशोक खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने गुरुवारी सकाळी ७ वाजता शिर्डी, कोपरगाव आणि संगमनेरमध्ये एकाच वेळी छापे टाकले. खरातच्या काळ्या पैशांचे साम्राज्य सांभाळणाऱ्या भक्तांवर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील बड्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. जानेवारीत शिर्डीतील महिला भक्ताने खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत खंडणी मागितल्याची तक्रार…

Read More

सोहळा साजरा:गणेशोत्सवात यंदा ‘दगडूशेठ’ वृंदावनमधील प्रेम मंदिरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा साजरा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. श्री राधा-कृष्णांप्रति असलेले दिव्य प्रेम, भक्तीचा वास असलेल्या प्रेम मंदिराच . सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले, गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरिता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदा ज्या प्रेम मंदिराची प्रतिकृती…

Read More

शिवसेना @ 60:भुजबळ, राणे, शिंदेंपासून ते 6 खासदारांच्या बंडापर्यंत…साठाव्या वर्धापन दिनी वाचा वाघाची डरकाळी फोडणाऱ्या दोन्ही शिवसेनेचे 'बॅलन्स शीट'!

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर आपला अमीट ठसा उमटवणारी शिवसेना आज आपल्या स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. मात्र, याच ऐतिहासिक दिवशी शिवसेना ठाकरे गटाला (उबाठा) आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस अत्यंत गुप्तपणे सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ला अखेर यश आले असून, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 6 खासदारांनी बंडाचे…

Read More

आता फुटण्याचा नंबर राष्ट्रवादी काँग्रेसचा का?:शशिकांत शिंदे म्हणाले – तो प्रश्न सोडून द्या, भाजपचा फुगा फुटल्यास जागा पुन्हा 2 वर येतील

“आता पुढचा नंबर तुमच्या, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे,” असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असून असा कोणताही क्रम किंवा ‘नंबर’ नसतो. त्यामुळे आमचा पक्ष फुटणार, अशी चर्चा करणे थांबवावे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवरही थेट निशाणा…

Read More

नागपूर धर्मांतर प्रकरण:फरार मौलानाला अटक, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली

नागपूर येथील धर्मांतर प्रकरणात फरार असलेला तिसरा मुख्य आरोपी मौलाना मेहमुद मकसद याला अटक करण्यात आली आहे. हवाई दलातील जवानाच्या पत्नीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पीडितेचा बळजबरीने निकाह लावून देण्याचा प्रयत्न केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सोनेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांनी दिली. या गुन्ह्याची…

Read More

विदर्भात पावसाची 75 टक्के तूट:जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीच्या तुलनेत भीषण ओढ, चिंता वाढली

विदर्भात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या संकटात आल्या आहेत. प्रादेशिक हवामान विभागाच्या १ ते १८ जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण विदर्भ उपविभागात सरासरीच्या तुलनेत तब्बल ७५ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. या कालावधीत विदर्भात सामान्यतः ७९.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात केवळ १९.७ मिमी पाऊस पडला आहे. विदर्भातील सर्व ११…

Read More

नागपुरात डिजिटल करन्सी घोटाळ्याचा 500 कोटींचा डाव उधळला:दोन मुख्य सूत्रधार जेरबंद, अब्जावधींची फसवणूक टळली

नागपुरात ‘फ्री कॉईन’ आणि ‘मर्चंट कॉईन’ या डिजिटल करन्सीच्या नावाखाली २५ गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यामुळे या महाठगांचा तब्बल १० लाख २४ हजार युजर्सकडून ५०० कोटी रुपये उकळण्याचा डाव फसला असून, अब्जावधी रुपयांची संभाव्य फसवणूक टळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातून मिहुल…

Read More

नागपुरात 8 ड्रग्ज तस्करांवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई:शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीचे कंबरडे मोडले

नागपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आंतरजिल्हा ड्रग्ज तस्कर टोळीवर ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत टोळीचा प्रमुख सतीश सुभाष वडे याच्यासह एकूण आठ तस्करांचा समावेश आहे. या टोळीवर अंमली पदार्थांची बेकायदेशीर खरेदी-विक्री, वाहतूक आणि वितरण केल्याचा आरोप…

Read More

नागपुरात 'बिलाल इंटरप्रायजेस'वर धाड:नोटांच्या नावावर कोऱ्या कागदांची बंडले देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 7 जणांना अटक

नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्र. ५ ने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘बिलाल इंटरप्रायजेस’ नावाच्या कार्यालयावर गुरुवारी रात्री धाड टाकून पोलिसांनी ७ आरोपींना रंगेहात अटक केली. आरोपींकडून कार, जीप आणि इतर मुद्देमालासह एकूण २० लाख ४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपी जास्तीच्या…

Read More