Headlines

सोहळा साजरा:गणेशोत्सवात यंदा ‘दगडूशेठ’ वृंदावनमधील प्रेम मंदिरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा साजरा



श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने १३४ व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. श्री राधा-कृष्णांप्रति असलेले दिव्य प्रेम, भक्तीचा वास असलेल्या प्रेम मंदिराच

.

सरचिटणीस व आमदार हेमंत रासने म्हणाले, गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरिता ट्रस्ट प्रयत्नशील आहे. यंदा ज्या प्रेम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे,

“दगडूशेठ’ गणपती मंदिरामध्ये शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट

शेषनागाच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गाभाऱ्यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रुप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात स्वराभिषेकाचे देखील आयोजन करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारण्यात आली.

मंदिराच्या वर दर्शनी भागात राधा-कृष्णाची भव्य मूर्ती

मुख्य प्रतिकृतीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रनिंग मांडवावर कृष्णलीलेतील विविध प्रसंग साकारण्यात येणार आहेत. मंदिराच्या वर दर्शनी भागात राधा-कृष्णाची भव्य मूर्ती देखील असणार आहे. अशा वृंदावनामधील विलोभनीय प्रेम मंदिराची प्रतिकृती गणेशोत्सव २०२६ मध्ये देश-विदेशातील गणेशभक्तांना पुण्यात पाहायला मिळणार आहे. प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये अनेक भव्य खांब असून विविध मूर्तीदेखील असणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *