![]()
भोंदू अशोक खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने गुरुवारी सकाळी ७ वाजता शिर्डी, कोपरगाव आणि संगमनेरमध्ये एकाच वेळी छापे टाकले. खरातच्या काळ्या पैशांचे साम्राज्य सांभाळणाऱ्या भक्तांवर ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील बड्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. जानेवारीत शिर्डीतील महिला भक्ताने खरातच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यावर अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत खंडणी मागितल्याची तक्रार दिली. याच प्रकरणाशी संबंधित व्यक्तीच्या घरावर गुरुवारी ईडीने छापा टाकला. ईडीच्या रडारवर शिर्डीतील साईमंदिरासमोरील महामार्गाच्या पूर्वेला राहणारी प्रतिष्ठित व्यक्ती होती. या व्यक्तीच्या निवासस्थानासह अन्य २ ठिकाणी झाडाझडती घेतली. ३ कोटींची रोकड, मालमत्तेचे दस्तावेज हाती गुरुवारी झालेल्या कारवाईतही शिर्डीतील व्यावसायिक व संगमनेरमधील आणखी अशा दोघांकडून ३ कोटी रोख व मालमत्तेची कागदपत्रे हस्तगत केल्याची माहिती विशेष सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. काळ्या पैशांची ‘लॉन्ड्री’ खरातकडील कोट्यवधींचा काळा पैसा शिर्डी आणि कोपरगाव परिसरातील रिअल इस्टेट, हॉटेल व्यवसाय आणि काही बड्या संस्थांच्या माध्यमातून ‘पांढरा’ (मनी लाँड्रिंग) करण्यात आल्याचे समोर आले आहे. या साखळीत काही स्थानिक ‘पांढरपेशा’ लोकांचाही थेट सहभाग असल्याचा संशय आहे.
Source link
दिव्य मराठी ब्रेकिंग:भाेंदू अशाेक खरातला ईडीचा दुसरा धक्का; शिर्डी, कोपरगाव, संगमनेरमध्ये छापेमारी, बड्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले