जळगावात विमानतळापेक्षा रेल्वे पार्किंग महाग:विमानतळावर कारसाठी 120, रेल्वे स्थानकावर 250 रु. शुल्क
जळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूट करण्याचा एक अजब प्रकार समोर आला आहे. ज्या किमतीत जळगाव ते मुंबईचे जनरल रेल्वे तिकीट मिळते, त्याच्या दीडपट रक्कम जळगावकरांना कार पार्किंगसाठी मोजावी लागत आहे. सुविधांच्या बाबतीत ठणठणपाळ असलेल्या रेल्वे पार्किंगचे दर आलिशान विमानतळाच्या दरांनाही मागे टाकत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या मूक संमतीवर आता संताप व्यक्त होत आहे. रेल्वेस्थानकाची अधिकृत…