Headlines

Admin

उद्धव अन् राज ठाकरेंनी एकत्र येऊन देशाचे राजकारण करावे:धारावीत मराठी माणसाला हात लावला तर अदानींशी थेट टक्कर- संजय राऊत

जे लोक आमचा पक्ष फुटणार अशी आवई उठवत आहेत, त्यांची शिवसेना हे नाव घेण्याचीही पात्रता नाही. हे पळपुटे लोक आम्हाला काय शिकवणार? अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ..तर यासोबतच त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. संजय राऊत म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता महाराष्ट्राच्या राजकारणातून…

Read More

डिंपल म्हणाल्या- अदितीवरील कमेंट्समागे भाजप:आता लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू; अखिलेश म्हणाले- पोलिसांना आरोपींना शोधता येत नसेल, तर आम्ही मदत करू

अदितीसंबंधी जी विधाने झाली आहेत, त्यामुळे ते खूप अस्वस्थ आहेत. असे भाजपवाले म्हणत आहेत. हे सर्व लोक तुमची दिशाभूल करत आहेत. ही जी वक्तव्ये झाली आहेत, ती भाजपच्या लोकांनीच करवून घेतली आहेत, पण आपल्याला लक्ष विचलित होऊ द्यायचे नाही. कारण यामागे खरे कारण राम मंदिरातील चोरीचे आहे. या मुद्यावरून लक्ष हटवण्यासाठी हा मुद्दा आणला गेला…

Read More

रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस:प्रकृती खालावली; सरकारला आजच्या दिवसाचा अल्टिमेटम, उद्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर ठिय्या

राज्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात पुकारलेल्या ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू असून, दिवसेंदिवस या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, तिसऱ्या दिवशी रोहित…

Read More

सह्याद्री पर्वतरांगेतील कळसूबाईच्या पायथ्याशी भ्रष्टाचाराचे “शिखर’:बारी ग्रा.पं.त दुसऱ्या गावांचे फोटो टाकून लाखो रुपये लाटल्याचा आरोप‎

अकोले महाराष्ट्रातील समुद्रसपाटीपासूनचे सर्वोच्च ठिकाण असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेतील ‘कळसूबाई शिखर’ ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते, त्याच आदिवासीबहुल आणि दुर्गम बारी ग्रामपंचायतीत विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा . वर्ष २०२४ ते २०२६ या कालावधीत हा घोटाळा झाला असून, देवेंद्र काशिनाथ खाडे व स्थानिक ग्रामस्थांनी याविरोधात जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी…

Read More

वाढत्या उन्हात शेतकऱ्यांची पिके जगवण्यासाठी कसरत:बागायत क्षेत्रात केलेल्या कपाशीच्या लागवडी उष्णतेने उगवणीपूर्वी जळू लागल्या‎

मृग नक्षत्र सुरू होऊनही राहुरी तालुक्यात अद्याप मान्सूनचे आगमन न झाल्याने बळीराजा पुरता चिंतेत सापडला आहे. जमिनीत उष्णता असल्याने अनेक शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पाण्याची सोय असल्याने कपाशीची आगाऊ लागवड केली, त्यांच्यावर आता . मशागती आटोपल्या, पण कृषी विभागाचा ‘वेट अँड वॉच’चा सल्ला तालुक्यात खरिपाच्या शेतीची मशागत होऊन तब्बल दोन आठवडे उलटले…

Read More

कारला लागलेल्या आगीत 2 तरुण जिवंत जळाले; VIDEO:डंपरने स्कॉर्पिओला 500 मीटर नेले फरफटत; रायपूरहून हरियाणाला येताना झाला अपघात

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे शनिवारी संध्याकाळी भरधाव हायवा डंपर आणि स्कॉर्पिओची धडक झाली. त्यात हरियाणामधील 2 तरुणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. अपघातानंतर स्कॉर्पिओला आग लागली. दोन्ही तरुण वाहनातच अडकले. जबलपूरपासून सुमारे 30 किमी दूर असलेल्या बरेला येथील शारदा मंदिराच्या जवळ हा अपघात झाला. एएसपी सूर्यकांत शर्मा यांनी सांगितले की, अपघातात जीव गमावलेले दोन्ही तरुण हरियाणातील…

Read More

पुरवठा न सुधारल्यास महावितरणला टाळे:सांगोल्यात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांचा इशारा‎

यावर्षी भीषण उन्हाळा जाणवला असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विजेचा प्रश्न गंभीर झाला असून भारनियमन वाढले आहे. तालुक्यात भारनियमन वाढल्याने शेतातील पिके, फळबागा जळून जात आहेत. तसेच जनावरांचे दूध काढण्याच्या वेळी वीज नसल्याने जनावरांच्या धारा हाताने काढण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी…

Read More

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करा:माळशिरसमध्ये राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन‎

राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली असून तसे तहसीलदार माळशिरस यांना निवेदन देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुकाध्यक्ष देविदास ढोपे यांच्या नेतृत्वात दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या नव्या कर्जमाफी योजनेतील…

Read More

मोहोळ शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बायपासची गरज:234 किमी लांबीच्या महामार्गाला सर्व्हिस रोड जोडल्याने अपघातांत वाढ‎

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग-९६५) हा आळंदी ते पंढरपूरसह मोहोळ ते वाखरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो सुमारे २३४ किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. पुणे, सातारासह सोलापूर जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग आहे. या मार्गास ७,६२५ कोटी रुपयांच्या तरतुदीसह विकसित करण्यात येणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. मात्र…

Read More

विंध्य हर्बलच्या उत्पादनांचा अहवाल संशयाच्या भोवऱ्यात:35% नमुने अयशस्वी झाल्याचा दावा, वैज्ञानिकाला सेवेतून काढण्याची शिफारस

विंध्य हर्बलच्या उत्पादनांचे नमुने फेल ठरल्यामुळे आणि येथे सुरू असलेल्या वादामुळे हर्बल उत्पादनांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानंतर, येथे कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले शास्त्रज्ञ डॉ. दीपक द्विवेदी यांची सेवा समाप्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे. द्विवेदी यांच्यावर आरोप आहे की, चाचणी अहवालात फेरफार करणे, गुणवत्ता तपासणीच्या मानकांमध्ये बदल करणे, अधिकाऱ्यांच्या सूचना न मानणे आणि…

Read More