Headlines

वीज कंपनीच्या नांदेड परिमंडलात 84 सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत:376 मेगावॅट सौर376 मेगावॅट सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध




महावितरणच्या नांदेड परिमंडलात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मध्ये भरीव कामगिरी करण्यात येत असून या योजनेतंर्गत परिमंडळात आजपर्यंत 84 सौर ऊर्जा प्रकल्प् कार्यान्वीत झाले. यातून कार्यान्वीत सौर प्रकल्पांतून 376 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होत आहे. या योजनेमुळे कृषीपंप ग्राहकांना दिवसाच्या कालावधीत सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. राज्यात शेती सिंचनासाठी महावितरण कडून विज जोडण्यात देण्यात आल्या आहेत. मात्र मागील काही वर्षात विजेची मागणी वाढल्याने वेळोवेळी भारनियमन करावे लागत होते. त्यामुळे रोटेशननुसार कधी दिवसा तर कधी रात्रीच्या वेळी विज पुरवठा सुरु राहात होता. शेतीसाठी रात्रीच्या वेळी विज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांना पाणी देण्याचे काम करावे लागत आहे. त्यातून शेतकऱ्यांना गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागत होते. दरम्यान, शेती सिंचनासाठी दिवसा विज पुरवठा उपलब्ध होण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या प्रचार प्रसिध्दी सोबतच नांदेड परिमंडळातील तीनही जिल्हयांनी आपापल्या जिल्हयात जनजागृती करून सौर ऊर्जा प्रकल्पाचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्हयात मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. या योजनेत आतापर्यंत 84 सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वीत झाले आहेत. या प्रकल्पातून काही ठिकाणी चार तर काही ठिकाणी पाच मेगावॅट सौर उर्जेची निर्मिती होत आहे. मागील दोन वर्षात हे प्रकल्प उभारण्यात आले असून यामध्ये नांदेड जिल्हयात सर्वाधिक 42 प्रकल्प सुरु झाले असून त्या पाठोपाठ हिंगोली जिल्हयात 23 तर परभणी जिल्हयात 10 प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पातून 376 मेगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती होत असून त्यातून शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी दिवसा विज पुरवठा उपलब्ध होऊ लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी सोय झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *