Headlines

Admin

चीफ पोस्टमास्तर जनरल होत येळीच्या सुपुत्राने रचला इतिहास:या पदावर विराजमान होणारे जिल्ह्यातील पहिले अधिकारी, जि. प. शाळा ते आयआयटी असा प्रवास‎

ग्रामीण भागात गुणवत्ता ठासून भरलेली असते, फक्त गरज असते ती जिद्दीची आणि कष्टाची. हेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील येळी गावचे सुपुत्र रामचंद्र किसन जायभाये यांनी. भारतीय डाक सेवेतील (IPoS) १९९९ बॅचचे वरि . रामचंद्र जायभाये हे यापूर्वी नवी दिल्ली येथील पोस्टल संचालनालयात जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी देशभरात…

Read More

मोशी डेपो दुर्घटनाग्रस्त इमारतीला केवळ तळमजल्याचा पूर्णत्वाचा दाखला:वरच्या दोन मजल्यांना परवानगीच नाही; गंभीर प्रश्न उपस्थित

मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या तीन मजली इमारतीत दुर्घटना घडली, त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला आणि आठ कामगार 65 तास अडकले होते. या इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच महापालिकेकडून पूर्णत्वाचा दाखला देण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाने 27 जुलै 2023 रोजी या ‘ॲडमिन बिल्डिंग’ला…

Read More

7 दुष्काळी गावांचा सिंचन योजनेत होणार समावेश:जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश‎

माढा तालुक्यातील सीना – माढा उपसा सिंचन योजनेमध्ये वंचित राहिलेल्या दुष्काळी ७ गावांचा समावेश करणे, खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती देणे आदीसह तालुक्याच्या सिंचन प्रश्नावर कार्यवाहीचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी दिले आहेत. जलसंधारण व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. यावेळी सीना– माढा उपसा सिंचन योजना तसेच खैराव- मानेगाव…

Read More

आंबे गावातील नागणे दाम्पत्य मृत्यू प्रकरणी वारसांना 5 लाखांची मदत:मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या विधानसभेतील पाठपुराव्याला यश‎

आंबे येथील लक्ष्मण नागणे आणि अलका नागणे या शेतकरी दाम्पत्याचा विजेचा धक्का लागून २८ जून रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मृत्यू झाला होता. नैसर्गिक आपत्ती आणि वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे मृत्यू ओढवलेल्या नागणे दाम्पत्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली असून वारसांपैकी एकाला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले…

Read More

डेटा नसलेले मोबाइल रिचार्ज प्लॅन स्वस्त होतील:ट्रायने मसुदा सादर केला, सूचना मागवल्या; किंमत 70% पर्यंत कमी होऊ शकते

दूरसंचार नियामक ट्रायने ग्राहकांच्या हितासाठी मोठे पाऊल उचलत ‘दूरसंचार ग्राहक संरक्षण नियम, २०२६’ चा नवीन मसुदा जारी केला आहे. याचा मुख्य उद्देश आहे – ‘डेटा नको असेल, तर त्याचे पैसे का द्यायचे?’ ट्रायने यावर सर्व पक्षांकडून सूचना मागवल्या आहेत, त्यानंतर याला अंतिम स्वरूप दिले जाईल. नवीन प्रस्ताव काय आहे? सध्या कंपन्या काहीच कालावधीसाठी ‘फक्त कॉल-एसएमएस’…

Read More

हिंगोलीत शालेय पोषण आहाराचा बोजवारा:शाळांमध्ये किडलेले वाटाणे अन् सडक्या डाळी, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

हिंगोली जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाचे धान्य निकृष्ठ असल्याने 1038 शाळांमधून 1.15 लाख विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. किडलेले वाटाणे, तांदूळात किडे अन आळ्या, डाळी खराब झालेल्या त्यामुळे हा पोषण आहार आहे का कुपोषण आहार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी मात्र शाळेची नांवे सांगा आम्ही तपासणी करतो…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आठ जणांचा शोध अद्याप सुरू; मुख्यमंत्री फडणवीसांचे तातडीचे निर्देश, बचावकार्याला गती

मोशी येथील कचरा डेपोत ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला आता ६५ तासांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही ढिगाऱ्याखाली दबलेल्या ८ बेपत्ता कामगारांचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. या कामगारांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) आणि महापालिका प्रशासनाकडून रात्रंदिवस युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेचा…

Read More

सीना नदीवरील पुलामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला:9 महिने उलटूनही दुरुस्ती नाही, केवड परिसरातील ऊस कारखान्याची अवजड वाहने आणि विद्यार्थ्यांचा प्रवास बनला जीवघेणा‎

. सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुरामुळे सिना नदीवरील पुलाचा भराव वाहून गेला असून पुलावर मोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या जॉईंटला भेगा पडल्या असून आतले गज उघडे पडल्याने पूल कमकुवत झाला आहे. तरीही गेल्या ९ महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून अपघात होण्याआधीच पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी…

Read More

आ. सावरकरांच्या पाठपुराव्याला यश:शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, महात्मा फुले योजनेतील 50 हजारांची जाचक अट रद्दची केली होती मागणी‎

अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कळीचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिल्याने, अकोला जिल्ह्यातील व राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सावरकर यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची मर्यादा ५० हजार रुपयांवरून दोन लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तब्बल ६३ लाख शेतकऱ्यांचा कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा…

Read More

2029 पासून लागू होऊ शकते वन नेशन वन इलेक्शन:संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणाले- 99% लोक बाजूने; राज्यांमधील तज्ञांचा सल्ला घेत आहेत

संसदेची संयुक्त समिती (JPC) 2029 च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ‘वन नेशन वन इलेक्शन’ लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी यांच्या मते, आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सुमारे 99% नागरिक आणि संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे. समितीने गोवा मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांसह अनेक राज्यांमधील तज्ञांकडून यावर सल्ला घेतला आहे. वन नेशन वन इलेक्शनशी संबंधित 5…

Read More