दिव्य मराठी वर्धापनदिन सोहळा:वाचकांच्या विश्वासाची 15 वर्ष, निर्भीड पत्रकारितेचा प्रवास; दिव्य मराठीच्या वाटचालीला वाचकांनी केला मानाचा मुजरा
दैनिक ‘दिव्य मराठी’ च्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (29 मे) सायंकाळी जालना रोडवरील सागर लॉन्स येथे स्नेहमिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 15 वर्षांतील वाटचालीचे साक्षीदार असलेले वाचक व मान्यवरांनी ‘दिव्य मराठी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. या विशेष सोहळ्याला शहरातील राजकीय नेतेमंडळी, प्रशासनातील अधिकारी, उद्योजक, साहित्यिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच…