![]()
दैनिक ‘दिव्य मराठी’ च्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (29 मे) सायंकाळी जालना रोडवरील सागर लॉन्स येथे स्नेहमिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 15 वर्षांतील वाटचालीचे साक्षीदार असलेले वाचक व मान्यवरांनी ‘दिव्य मराठी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. या विशेष सोहळ्याला शहरातील राजकीय नेतेमंडळी, प्रशासनातील अधिकारी, उद्योजक, साहित्यिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती लावत दिव्य मराठीच्या निर्भीड पत्रकारितेचे कौतुक केले. गेल्या 15 वर्षांत दिव्य मराठीने स्थानिक ते जागतिक घडामोडी, समाजातील प्रश्न, शिक्षण, रोजगार, क्रीडा, मनोरंजन आणि सर्वसामान्यांच्या समस्या यांना सातत्याने प्राधान्य देत वाचकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न कायम ठेवल्याच्या भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. ‘सकारात्मक सोमवार’सारख्या उपक्रमांमुळे अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे अनुभवही वाचकांनी यावेळी शेअर केले. आगामी काळातही दिव्य मराठीसोबत प्रगतीची वाटचाल कायम ठेवण्याचा विश्वास वाचकांनी व्यक्त केला.
Source link
दिव्य मराठी वर्धापनदिन सोहळा:वाचकांच्या विश्वासाची 15 वर्ष, निर्भीड पत्रकारितेचा प्रवास; दिव्य मराठीच्या वाटचालीला वाचकांनी केला मानाचा मुजरा