Headlines

Admin

विरोधकांनी प्रश्न विचारले की ती बदनामी?:मग जनतेने काय मरायचे का? ड्रग्जच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील वाढत्या ड्रग्जच्या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच धारेवर धरले आहे. “छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकर आणि संतांच्या संस्कारांचा थोर वारसा असलेला महाराष्ट्र कोणाच्या एका वक्तव्याने बदनाम होऊच शकत नाही. पण जेव्हा आम्ही ‘बदनामी’ शब्द वापरतो, तेव्हा ती राज्याच्या गौरवाबद्दल नसते, तर गल्लीबोळात पसरलेल्या ड्रग्जच्या भीषण…

Read More

बंगालमध्ये इमाम-मुअज्जिन आणि पुजाऱ्यांचे मानधन बंद:निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवशी ममतांनी ते वाढवले होते, महिलांना 1 जूनपासून ₹3000 मिळतील

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत इमाम, मुअज्जिन आणि पुजाऱ्यांना दिले जाणारे मानधन 1 जूनपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच महिलांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरमहा 3000 रुपये देण्याची, मोफत बस प्रवास सुरू करण्याची घोषणा केली आहे. सातवा वेतन आयोग स्थापन करणे आणि ओबीसी यादीत बदल करण्यासारखे महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले. याशिवाय, टीएमसी सरकारच्या…

Read More

हिंगोली जिल्ह्यात डिझेलची अचानक मागणी वाढल्याने टंचाई:वाहनधारकांनी आवश्यक तेवढेच डिझेल घ्यावे, प्रशासनाचे आवाहन

हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात डिझेलची अचानक मागणी वाढली असून त्यामुळे डिझेलचा तुटवडा भासू लागला आहे. मात्र कंपन्यांकडून डिझेलचा पुरवठा सुरळीत होत असून वाहनधारकांनी आवश्यक तेवढे डिझेल भरावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील पंधरा दिवसापासून डिझेलची मागणी अचानक वाढली आहे. सध्या शेतीची कामे सुरू असून नांगरणी व…

Read More

तेजा सज्जाची ‘हनु-मॅन’ आता 3D मध्ये:25 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल; पुढील भागात ऋषभ शेट्टीच्या एंट्रीमुळे चाहत्यांचा उत्साह वाढला

तेलुगु सुपरहिरो चित्रपट ‘हनु-मॅन’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परत येणार आहे. यावेळी हा चित्रपट 3डी फॉरमॅटमध्ये प्रदर्शित केला जाईल, ज्यामुळे प्रेक्षकांना पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि रोमांचक सिनेमाचा अनुभव मिळेल. निर्मात्यांनी अधिकृत घोषणा करत सांगितले की, ‘हनु-मॅन 3डी’ 25 जून 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. निर्मात्यांनी नवीन पोस्टरसह सोशल मीडियावर माहिती शेअर करत म्हटले की,…

Read More

पालघरमध्ये वऱ्हाडींचा ट्रक अन् कंटेनरची धडक:12 जणांचा मृत्यू, 20 ते 25 गंभीर जखमी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी वऱ्हाडी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात १२ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर २० ते २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता पाहता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त…

Read More

NCP चे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी:आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार पक्षाध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा दावा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. काही लोक पक्षाविषयी मुद्दाम षडयंत्र रचत आहेत. पण आम्ही सर्वजण सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत, असे ते म्हणालेत. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे…

Read More

घटस्फोटावर बोलले मौनीचे पती सूरज:आमच्यात कोणताही वाद किंवा पोटगीचा व्यवहार नाही; अफवा पसरवणे थांबवा

अभिनेत्री मौनी रॉय आणि त्यांचे पती सूरज नांबियार यांनी गेल्या गुरुवारी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. आता या प्रकरणी उद्योगपती सूरज नांबियार यांचे विधान समोर आले आहे. सोमवारी जारी केलेल्या या निवेदनात सूरज यांनी माध्यमांमध्ये सुरू असलेल्या अफवांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या वेगळे होण्याच्या निर्णयात कोणताही वाद, पोटगी किंवा…

Read More

'लालपरी'चा प्रवास महागणार?:डिझेल दरवाढीमुळे महामंडळावर वार्षिक 124 कोटींचा अतिरिक्त भार, परिवहन मंत्र्यांकडून भाडेवाढीचे संकेत

जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या तणावाचा फटका आता सर्वसामान्यांची वाहिनी असलेल्या ‘एसटी बस’ला बसण्याची शक्यता आहे. देशातील इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या तिकिटात वाढ होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत…

Read More

सोलापूरमध्ये आढळला अत्यंत दुर्मिळ 'ल्युसिस्टिक' नाग:डोक्यावर आहेत पांढरे ठिपके; वन्यजीव संस्थेकडून सुरक्षित रेस्क्यू

बाळे (तोडकर वस्ती) भागात एका निवासी घराच्या आवारात दुर्मिळ प्रजातीचा ‘ल्युसिस्टिक’ नाग आढळून आला आहे. शनिवारी, १६ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक रहिवाशांना आपल्या वॉल कंपाऊंडजवळ एक साप दिसला. त्यांनी तात्काळ वन्यजीव संस्थेला याची माहिती दिली. ​संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, सुमारे पावणेपाच फूट लांबीचा हा विषारी नाग असल्याचे स्पष्ट झाले. मात्र,…

Read More

शिवसेनेच्या बैठकीला बड्या नेत्याची दांडी:माजी खासदार देणार एकनाथ शिंदेंना धक्का; हेमंत गोडसे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष्य

सत्ताधारी शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नाशिक येथील बैठकीला माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दांडी मारली आहे. यामुळे हेमंत गोडसे वेगळी वाट निवडणार काय? अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरू झाली आहे. त्यांनी खरेच अशी भूमिका घेतली तर ती एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक मोठा धक्का असेल. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून…

Read More