आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तीरसात तल्लीन झाली असतानाच, वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलातील (SRPF) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक व दुर्दैवी घटना उ
.
जीवन संपवणाऱ्या 30 वर्षीय एसआरपीएफ जवानाचे नाव रामेश्वर ध्रुपद साबणे असून ते मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी होते. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास, ज्यावेळी मंदिरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा सुरू होती, नेमक्या त्याच वेळी त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून घेत हे टोकाचे पाऊल उचलले.
गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात तैनात असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र गंभीर दुखापत झाल्यामुळे रामेश्वर साबणे यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांनी ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले, याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसून पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ही देखील बातमी वाचा
‘आषाढी’ला जनसागर:पंढरीत विठ्ठलाच्या चरणी 25 लाख भाविक, दर्शनासाठी 28 तासांची प्रतीक्षा; फडणवीसांची सपत्नीक महापूजा

श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस व मानाचे वारकरी दांपत्य यांच्या हस्ते परंपरेनुसार ही पूजा झाली.
पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी तब्बल २८ तास लागत आहेत. वाचा सविस्तर