![]()
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त तीन वर्षांपूर्वी (१६ सप्टेंबर २०२३) शहरात झालेल्या राज्य मंत्रिमंडळात ५९ हजार कोटी रुपयांच्या कामाची घोषणा केली. यामध्ये नवीन योजना, जुन्या योजनांच्या सुप्रमा, चालू योजनांचा निधी आदी विविध तरतुदी कर
.
मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी मराठवाड्यात दरवर्षी मुक्तिसंग्रामदिनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. महायुती सरकारलाही घोषणेचा विसर पडल्याचे दिसत आहे. तीन वर्षांपूर्वीच्या बैठकीतील घोषणांपैकी ३० ते ४० टक्केही कामे पूर्ण झाली नसल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. यासोबतच मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठवाड्यात चांगलाच तापला असल्याने याठिकाणी बैठक घेतल्यास अनुचित प्रकार घडण्याची भीती सरकारला असल्याने देखील बैठक टाळली जात असल्याची चर्चा आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला अवघे ८ दिवस शिल्लक असून मंत्रिमंडळ बैठकीची कोणतीही सूचना आली नसल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीबाबत शासनाकडून कोणत्याही सूचना अद्याप प्राप्त नाही. सूचना प्राप्त झाल्यास तयारी करण्यात येईल. दरवर्षी १७ सप्टेंबरच्या अनुषंगाने असलेली सर्व तयारी पूर्ण केली जात आहे. माजी विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे म्हणाले की, २०२३ ला केलेल्या घोषणा पूर्ण न केल्याने मराठवाड्यातील जनतेला सरकारला तोंड दाखवायला जागा नाही. हे सरकार मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष करणारे आहे.
विशेष बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
मराठवाड्याच्या प्रश्नांवर राजधानी छत्रपती संभाजीनगर येथे राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतः पाठपुरावा करणार आहोत. – अतुल सावे, बहुजन कल्याण मंत्री
मराठवाड्यासाठी मोठ्या घोषणा अपेक्षित
या वर्षी दुष्काळाची परिस्थिती असल्याने ही बैठक होणे आवश्यक होते. बैठक रद्द झाल्याने १७ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी मोठी घोषणा करावी अशी अपेक्षा आहे. – संजय शिरसाट, पालकमंत्री