Headlines

Admin

जावेद जाफरी यांच्या पत्नीची 16 कोटींची फसवणूक:मुख्य आरोपीला अटक; बीएमसी आयुक्तांसह 6 जणांवर गुन्हा, घरी येऊन केली बनावट नोंदणी

मुंबई क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलने बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांच्यासोबत झालेल्या 16.24 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक केली आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणात बीएमसी (BMC) चे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी कर सेटलमेंट आणि गुंतवणुकीच्या नावाखाली जाफरी कुटुंबाला त्यांच्या कटात फसवले. बीएमसी…

Read More

पटेल, तटकरे हे दोघेही सक्षम नेते:त्यांचे पक्षातील स्थान कधीही कमी होणार नाही – अनिल पाटील; शरद पवारांनी केलेल्या प्रशंसेवरही भाष्य

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरेंना पक्षाच्या कार्यकारिणीतून वगळण्यात आले नसल्याचा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे दोघेही पक्षाचे सक्षम नेते आहेत. त्यामुळे त्यांचे पक्षातील स्थान कधीही कमी होणार नाही, असे ते म्हणालेत. शरद पवारांनी तटकरे व पटेल या दोन्ही नेत्यांचे कोणत्या…

Read More

डंके की चोट पर… फडणवीसांसमोर विजयही फिका:कॉलेजला जात होते की विधानभवनात?; बुलेट स्वारीवर गुणरत्न सदावर्ते फिदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनोख्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री थेट ‘रॉयल एनफिल्ड 350’ या बुलेट दुचाकीवरून विधानभवनात दाखल झाले. त्यांच्या या वेगळ्या स्टाईलची सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या या बुलेट स्वारीनंतर विविध प्रतिक्रिया उमटत असून, वकील गुणरत्न सदावर्ते…

Read More

हडपसर बॉम्ब सदृश घटना दहशतवादी कृत्य नाही:वैयक्तिक वादातून घडला प्रकार, आरोपी शिवाजी राठोड पोलिसांच्या ताब्यात

हडपसर येथील रुग्णालयात ठेवण्यात आलेली बॉम्ब सदृश वस्तू दहशतवादी कृत्य नसून वैयक्तिक वादातून घडलेला प्रकार आहे, असे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. ही वस्तू त्याच दिवशी निकामी करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी शिवाजी राठोड याच्या घर आणि दुकानाची झडती घेण्यात आली. त्याच्या घरातून घड्याळाचा रिकामा बॉक्स मिळाल्याने आरोपीची ओळख पटली. तांत्रिक…

Read More

आंबा-काजू उत्पादकांच्या प्रश्नावरून राजू शेट्टींनी सरकार घेरलं:म्हणाले- कायदा मोडून सत्ता टिकवता, मग आमचा लढा चुकीचा कसा?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्य सरकार नियम आणि कायदे पायदळी तुडवत सत्ता चालवत असेल, तर शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या न्यायासाठी सविनय कायदेभंग केला तर त्यात चुकीचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा…

Read More

मूव्ही रिव्ह्यू:मुद्दे मोठे, स्टार्स दमदार… तरीही ‘कर्तव्य’ अपूर्ण राहिली, सैफची मेहनतही चित्रपटाला वाचवू शकली नाही

ओटीटीच्या काळात अशा चित्रपटांची कमतरता नाही, जे समाजातील कटू सत्य समोर आणण्याचा दावा करतात. कर्तव्य देखील त्याच मार्गावर चालताना दिसतो. चित्रपट जातीयवाद, ऑनर किलिंग, ढोंगी बाबांचे नेटवर्क, सिस्टीममधील भ्रष्टाचार आणि माणुसकी यांसारख्या अनेक गंभीर मुद्द्यांना एकाच वेळी स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. वरिष्ठ कलाकार सैफ अली खान, रसिका दुग्गल आणि संजय मिश्रा यांसारखे दमदार कलाकारही आहेत….

Read More

MPतील धार भोजशाळेला HCने वाग्देवी मंदिर मानले:हिंदूंना पूजेचा अधिकार दिला; मुस्लिम पक्ष याला कमाल मौला मशीद म्हणतो

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने धार येथील भोजशाळेला वाग्देवी मंदिर मानले आहे. शुक्रवारी दिलेल्या निर्णयात न्यायालयाने भोजशाळेचे संरक्षण एएसआयला (ASI) दिले आहे, परंतु हिंदूंना येथे पूजेचा अधिकार दिला आहे. मुस्लिम पक्ष याला कमाल मौला मशीद म्हणतो. न्यायालयाने मुस्लिम पक्षाला सरकारकडे मशिदीसाठी जमीन मागण्यास सांगितले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर इंदूर आणि धार जिल्हा प्रशासन सतर्कतेच्या मोडवर आहे….

Read More

जातीनिहाय जनगणनेचा मार्ग मोकळा:दुसऱ्या टप्प्यात ओबीसींची स्वतंत्र गणना होणार, मंत्री छगन भुजबळ यांची महत्त्वपूर्ण माहिती

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जातीनिहाय जनगणनेचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या प्रक्रियेत ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेसह इतर काही महत्त्वाच्या बाबींवर केंद्राने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जगगणना केली जाईल, असे ते म्हणालेत. सध्या देशभरात जनगणनेची प्रक्रिया सुरू आहे. त्याद्वारे विविध घटकांची माहिती संकलित…

Read More

पुण्यातील रुग्णालयात IED ठेवणारा आरोपी जेरबंद:ATS ने पुलगाव रेल्वे स्थानकावर आवळल्या मुसक्या; पळून जाण्याच्या होता बेतात

पुण्यातील हडपसर परिसरातील रुग्णालयात स्फोटक ठेवून खळबळ उडविणाऱ्या प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करीत मुख्य संशयित आरोपीला नागपूरजवळील पुलगाव रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले आहे. शिवाजी राठोड हा आरोपी रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना एटीएसने ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील हडपसर भागातील उषाकिरण हॉस्पिटल परिसरात संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर बुधवारी रात्री मोठी खळबळ…

Read More

'भाजयुमो'ची युवा शक्ती जागर यात्रा पश्चिम महाराष्ट्रात:पुण्यातून दौऱ्याला प्रारंभ; कृष्णराज महाडिक यांनी सांगितली उद्दिष्टे

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशातर्फे आयोजित ‘युवा शक्ती जागर यात्रे’चा पश्चिम महाराष्ट्रातील टप्पा पुणे शहरातून सुरू झाला आहे. या यात्रेचा मुख्य उद्देश युवाशक्तीला संघटित करणे आणि सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवणे हा आहे, असे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोकण विभागातील प्रवास पूर्ण झाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ही…

Read More