Headlines

Admin

मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाच्या विस्ताराला मंजुरी:मुंढवा ते मांजरी बुद्रुकपर्यंतच्या कामाला हिरवा कंदील

मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करणे, पूरस्थितीवर नियंत्रण आणणे आणि नदीकाठाचा विकास साधण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा’च्या विस्ताराला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. भाजपचे नगरसेवक दादा कोद्रे यांनी मुंढवा ते मांजरी बुद्रुकपर्यंत हा प्रकल्प वाढवण्याची मागणी केली होती, असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. सध्या मुळा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम संगम ते…

Read More

पगार थकल्याने सुरक्षारक्षकाची आत्महत्या:सिंहगड कॉलेज संस्थापक, विश्वस्तांवर गुन्हा दाखल

सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याने तब्बल ४२ महिन्यांचा पगार थकल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याप्रकरणी आता सिंहगड संस्थेच्या संस्थापकांसह विश्वस्तांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पगार न दिल्याने आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावातून संबंधित कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सेक्रेटरी…

Read More

नागपुरात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला:15 वर्षीय मुलीचे भवितव्य सुरक्षित, तक्रारीनंतर कारवाई

नागपुरात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर मिळालेल्या तक्रारीनंतर जिल्हा बाल संरक्षण यंत्रणेने तातडीने कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून तिचा विवाह नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथील एका २४ वर्षीय युवकासोबत निश्चित करण्यात आला होता. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना…

Read More

विदर्भाच्या विकासाला गती!:547 किमीच्या चार द्रुतगती महामार्गांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 51,906 कोटींचा प्रकल्प

महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील 547 कि.मी.च्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी…

Read More

आरक्षणाची सवलत घेणाऱ्यांना आता खुल्या प्रवर्गाचे दरवाजे बंद:महाराष्ट्र सरकारकडून आरक्षणाचे नवीन धोरण जाहीर; भरती प्रक्रियेत होणार बदल

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी नोकरीतील आरक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, ज्या उमेदवारांनी आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांना आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा सांगता येणार नाही. केंद्र सरकार आणि गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही हे आरक्षणाचे नवे धोरण निश्चित केले असून, या निर्णयामुळे राज्य सरकारी नोकरभरतीच्या प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत. राज्य सरकारने…

Read More

'डायल 112' च्या मदतीला पोहोचण्यास उशीर:हिंगोलीत पोलिस अंमलदार निलंबित, पोलिस अधीक्षकांची मोठी कारवाई

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि तातडीच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘डायल 112’ सुविधेबाबत हिंगोली पोलीस दलाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. मदतीसाठी कॉल आल्यानंतर घटनास्थळी वेळेत न पोहोचल्यामुळे कळमनुरी पोलीस ठाण्यातील एका अंमलदाराला तात्काळ निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी गुरुवारी ता. 14 काढले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तेरा पोलीस ठाण्यांतर्गत…

Read More

Ladki Bahin Scheme: Rs 1500 Deposited, 3000 Expected

राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, लाभार् . फेब्रुवारी महिन्यानंतर मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे रखडला होता. मे महिना उजाडल्यानंतरही खात्यात पैसे…

Read More

शबरीमला प्रकरण, सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुरक्षित:16 दिवस चालली सुनावणी; न्यायालयाने केंद्र, धार्मिक संघटना आणि याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद ऐकले

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी शबरीमला मंदिर आणि इतर विविध धार्मिक स्थळांमध्ये महिलांच्या प्रवेशाशी आणि त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरणांची सुनावणी पूर्ण केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाने 16 दिवस केंद्र सरकार, धार्मिक संघटना आणि याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद ऐकले. न्यायालय धार्मिक स्वातंत्र्य, अनुच्छेद 25 आणि 26 ची व्याप्ती, संवैधानिक नैतिकता…

Read More

मोदींचा काटकसरीचा सल्ला अन् साताऱ्यात उधळपट्टी!:टीकेची झोड उठताच सरकारचा 'यू-टर्न'; 400 एसटी बसेसचे नियोजन रद्द

साताऱ्यात शुक्रवारी होणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी हेलिपॅड, लाभार्थ्यांसाठी 400 एसटी बसेस, हजारो फूड पॅकेट्स आणि पंखे, कुलरसाठी लाखोंची उधळपट्टी सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामविकास मंत्रालयाने तातडीने खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच लाभार्थ्यांची संख्या कमी केली असल्याचे स्पष्टीकरण मंत्री जयकुमार गोरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

पुण्यात रेडझोनच्या नवीन इंजिनिअरिंग आणि एआय हबचे उद्घाटन:उत्पादन क्षेत्राच्या डिजिटलायझेशनला मिळणार गती, संशोधनाला चालना

देशातील तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्राचे प्रमुख केंद्र असलेल्या पुण्यात ‘रेडझोन’ या अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनीने आपल्या नवीन ‘इंजिनिअरिंग आणि एआय हब’चे उद्घाटन केले. या विस्तारामुळे कंपनीच्या भारतातील कामकाजाला नवी गती मिळणार असून, उत्पादन तंत्रज्ञान आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमधील संशोधनाला मोठी चालना मिळेल. पुण्यातील हे अत्याधुनिक केंद्र प्रामुख्याने प्रॉडक्ट इंजिनिअरिंग, क्लाउड टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल डेटा सिस्टिम्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स…

Read More