मलाडमध्ये मनसेच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचा फोटो लावण्यात आला आहे, तिथे शिवरायांचा अपमान होत नाही का? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी अमित ठाकरेंना केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
.
नवनाथ बन म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना माध्यमांमध्ये चांगली स्पेस मिळते ती आपल्याला मिळत नाही या भावनेतून अमित ठाकरे काही तरी नौटंकी करत आहेत. आदित्य ठाकरेंपक्षा आपण वरचढ ठरलो पाहिजे हे दाखवण्यासाठी हे सर्व काही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढणाऱ्यांना अद्दल घडवली जाईल. मोदी यांचा फोटो देशाचे पंतप्रधान म्हणून कॉलेजमध्ये लावण्यात आला होता. संजस राऊत, उद्धव ठाकरेंचे फोटो कोणत्याच बॅनरवर लागत नाही याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे.
मातोश्रीवर औरंगजेब अन् दिपकेंचा फोटो
नवनाथ बन म्हणाले की, राऊत काही काळापासून मोदी यांचा नाही तर राहुल गांधी यांचा फोटो लावत त्यांचा उदोउदो करत आहेत. त्यांना राहुल गांधी यांना नेता मानायचे आहे. मालेगाव मनपात टिपू सुलतानचा फोटो लागला त्यावेळी त्यांना काही वाटले नाही. मातोश्रीवर अभिजीत दिपके आणि औरंगजेबाचे फोटो लागले त्यांचे काही वाटले नाही असा खोचक टोला बन यांनी लगावला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उबाठाकडून सुरू आहे. आम्ही उबाठासारखे औरंगजेबाचे फोटो घेऊन मते मागत नाही.
2029 मध्ये आदित्य ठाकरेंचे डिपॉझिट जप्त होणार
नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणत होते की एकतर तुम्ही राहताल किंवा मी राहील पण महाराष्ट्राने तुमचे अस्तित्व संपवले. तुम्हाला घरामध्ये बसावे लागले ही तुमची अवस्था झाली आहे. पुढच्यावेळी आदित्य ठाकरे यांचे देखील डिपॉझिट जप्त होणार आहे. भाजप आणि अमित शहांच्या नादी लागू नका.
जनतेने उबाठाचा मुद्देमाल जप्त केला
नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा मुद्देमाल महाराष्ट्रातील जनतेने जप्त केला आहे. आता मातोश्रीवर ना मुद्दा राहिला आहे ना माल. तुमच्या पक्षाची वाताहात झाली आहे. आता तुमचे उरलेले आमदार तुमच्याकडे राहतात का याकडे लक्ष द्या. राहुल गांधींना मुद्दा बनवण्याचा प्रयत्न राऊतांकडून सुरू आहे, पण जे गेल्या 14 वर्षांमध्ये काँग्रेसला जमले नाही ते तुम्हाला काय जमणार. उबाठाचे सर्व मुद्दे देशविरोधी आणि औरंगजेबाचे आहेत. उबाठाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्यात आला आहे. हे ही वृत्त वाचा डाकूंच्या मदतीने बाळासाहेबांचं पवित्र धनुष्यबाण चोरलं!:संजय राऊत म्हणाले- चिन्ह गोठवण्याची वेळ शिंदेंमुळेच आली; निकाल लागल्यावर त्यांना स्वत:चीच लाज वाटेल!

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज शिंदे गटाच्या वतीने युक्तिवादाला सुरुवात होत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या 7 ते 8 दिवसांपासून कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांच्या निर्णयांवर कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे प्रश्न उपस्थित केले आहेत. आता शिंदे गटाने कितीही मोठे वकील उभे केले तरी अंतिम निर्णय घटनापीठाला संविधानाच्या चौकटीतच द्यावा लागेल, असे राऊत म्हणाले. वाचा सविस्तर