![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे प्रशासकीय व लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले. यात २०२९ पर्यंत राज्याला पूर्णपणे अमली पदार्थमुक्त करण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाला मंजुरी देण्यात आली. याशिवाय कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी सुधारित निधी, सोलापूरमधील उड्डाणपूल आणि शासकीय कार्यालयांत आरोग्यदायी आहाराचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच इतर महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत. कुकडी प्रकल्पासाठी ५,७०४ कोटींची तरतूद पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसह ५ हजार ७०४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. शासकीय बैठका व कॅन्टीनमध्ये आरोग्यदायी मेनू बंधनकारक शासकीय बैठकांत तेलकट आणि अतिप्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांऐवजी ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी, डाळी आणि उसळी यांसारख्या स्थानिक पौष्टिक पदार्थांना प्राधान्य दिले जाईल. जुना पुणे नाका ते बोरामणी नाका उन्नत मार्गही होणार राष्ट्रीय महामार्ग ६५ वरील ९.६६ किलोमीटर लांबीच्या जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या चार पदरी उन्नत मार्गाला ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आले. नशामुक्तीचा पाचवीपासून अभ्यासक्रमामध्ये धडा नशामुक्तीचे सर्वसमावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे. या धोरणांतर्गत २०२७ पासून शालेय शिक्षणात इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात नशाविरोधी जनजागृतीचा धडा समाविष्ट करण्यात येणार आहे.
Source link
तीन वर्षांमध्ये महाराष्ट्र नशामुक्त करण्याचा राज्य सरकारचा निर्धार:मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कुकडी प्रकल्पासह सोलापूर उन्नत मार्गाला मंजुरी