![]()
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे. प्रकृती खालावलेली असतानाही जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मंगळवारी रात्री जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मराठवाड्यात कुणबी नोंदी आढळल्यानंतर आतापर्यंत किती जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, याची सविस्तर माहिती जरांगे पाटलांना दिली. यासोबतच बीड जिल्ह्यातील कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाची आकडेवारीही त्यांच्यासमोर मांडण्यात आली. मात्र, हा विषय सनदी अधिकाऱ्यांच्या स्तरावरील नसून थेट शासनाच्या अखत्यारीतील आहे, अशी स्पष्ट भूमिका घेत जरांगे पाटील यांनी प्रशासनाशी पुढील चर्चेस नकार दिला.
Source link
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5 वा दिवस:जरांगेंची प्रकृती खालावली, पण भूमिकेवर ठाम, अनेक जिल्ह्यात आंदोलनाचे पडसाद