Headlines

आषाढी हा सामाजिक ऐक्य, सेवा, समतेचा संदेश देणारा सण- महापौर:माळीवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर विठू नामाने दुमदुमला‎

आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य, सेवा व समतेचा संदेश देणारा सण आहे. संत सावता माळी, संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांची शिकवण आपल्याला परिश्रम व समाजसेवेची प्रेरणा देते. महापालिकेच्या वतीने शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाचे जतन केले जाईल, असे प्रतिपादन महापौर ज्योती गाडे यांनी केले. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर माळीवाडा…

Read More

पैठणमधील विकासकामे, प्रलंबित‎प्रश्न मार्गी लावा- आमदार भुमरे‎:एसटीपी, पाणीपुरवठा, हद्दवाढ, प्राधिकरणाचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा

पैठण शहर व तालुक्यातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार विलास भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पैठण-आपेगाव विकास प्राधिकरण, पैठण नगर परिषद तसेच पुरातत्त्व विभागाच्या विविध प्रलंबित व सुरू असलेल्या…

Read More

वनोलीत 586 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ:6 हजार नागरिकांची उपस्थिती, रक्तदान शिबिर व विविध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी‎

येवला एरंडगाव येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून ३ हजार ११ लाभ व सेवांचे वितरण करण्यात आले. या शिबिरात शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. तसेच क्यूआर कोडयुक्त स्मार्ट रेशन कार्डच्या प्रतिकृतीचे अनावरण अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. एरंडगाव…

Read More

गावकरी चिंतेत:नरला गावामधील 40 वर्षांपूर्वीची पाण्याची टाकी आली मोडकळीस, जिल्हा प्रशासनाने दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांमधून मागणी‎

खामगाव फुलंब्री तालुक्यातील नरला येथील संपूर्ण गावाला गेली ४० वर्षांपासून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाण्याची टाकी आता पूर्णपणे जीर्ण झाली आहे. टाकीच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून त्यातून सतत पाणीगळती होत आहे. ही टाकी कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाल्याने, संपूर्ण नरला गावावर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. १२० लोकसंक्या असलेल्या नरला गावातील स्थानिक…

Read More

देवेंद्रांना दिल्लीचे बाेलावणे:जाण्याआधी… संत तुकारामांना आठवत म्हणाले, ‘जे जे हाेईल, ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान’… तीन तासांत दिल्लीतून परतलेही

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक शनिवारी सकाळी दिल्ली दौऱ्यावर गेले आणि तीन तासांनी परत आले. सोलापुरातून नागपूरला येऊन ते दिल्लीला गेले होते. सोलापूर येथे त्यांना केंद्रात मंत्रिपदाविषयी विचारल्यावर त्यांनी संत . दिल्लीत फडणवीस नेमके कुणाला भेटले याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, ‘फडणवीसच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील,’ असा दावा फडणवीसांच्या अत्यंत विश्वासू कोअर…

Read More

राज्यात 18 जिल्ह्यांत 5 दिवस पाऊस उसंत घेणार:कोकण, मध्य महाराष्ट्रात आज जोरदार तर विदर्भात हलका ते मध्यम पाऊस होईल

गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागात सुरू असलेला पावसाचा जोर शनिवारी मंदावला. बंगालचा उपसागर तसेच राजस्थानवर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे येत आहेत. म्हणून रविवारी रायगड, रत्नागिरी तसेच सातारा घाट परिसरात ऑरेंज तर . दुसरीकडे खान्देश, नाशिकपासून सांगली-सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील १० आणि मराठवाड्यातील ८ अशा एकूण १८ जिल्ह्यांत ५ दिवस म्हणजे २७ ते ३१…

Read More

शालार्थ आयडी घोटाळा:841 पैकी 259 बोगस आदेश जळगावामधील, शिक्षणाधिकाऱ्याचे कारनामे

जिल्हा परिषद शिक्षण विभागातील १६० कोटीच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर याच्या कारनाम्याची धक्कादायक माहिती एसआयटीच्या तपासात समोर आली. २८ ऑस्ट २०११ ते जून २०२५ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमधील २५९ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देत काढलेले शालार्थ आदेश बनावट असल्याचे निष्पन्न झाले. धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्यातील ८४१ पैकी सर्वाधिक…

Read More

मेळघाटातील कुपोषण नियंत्रणासाठी उपाययोजना करणार:महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची ग्वाही

मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमधील कुपोषणाचा प्रश्न गंभीर असून, राज्य शासन यावर सकारात्मक पाऊले उचलत आहे. गेल्या काही काळात कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. येत्या काळातही माता आणि बाल संगोपनासाठी विविध उपाययोजना करून मेळघाटातील कुपोषण नियंत्रित करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. धारणी येथील तहसील…

Read More

भातकुली पंचायत समितीची इमारत गळकी:सीईओ गांधींना आला अनुभव, नवीन दालनासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश

भातकुली तालुक्यासाठी अमरावती येथे असलेल्या पंचायत समिती कार्यालयाची इमारत लवकरच बदलणार आहे. ही इमारत फार जुनी झाल्याने मोडकळीस आली आहे. सध्या ती गळकी इमारत म्हणून ओळखली जात असून, पाणी गळण्याचा अनुभव खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनाही आला आहे. यामुळे इमारत बदलण्याच्या कामाला गती मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी…

Read More

स्मार्ट मीटरविरोधात नांदगावात भाकपचे आंदोलन:योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर धरणे

नांदगाव खंडेश्वर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) स्मार्ट मीटरच्या विरोधात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केले. स्मार्ट मीटर योजना रद्द करावी, वीज ग्राहकांवरील आर्थिक भार कमी करावा आणि जनहिताच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. भाकपने स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आवाहनानुसारच नांदगावात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी स्मार्ट मीटरविरोधात…

Read More