Headlines

सरकारचे शंभर अपराध भरले म्हणून तरुणाईने सुदर्शन चक्र वापरले:अंबादास दानवेंचा घणाघात; छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाचा जल्लोष

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अखेर शनिवारी राजीनामा दिला. त्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तिरंगा जल्लोष सभेचे आयोजन केले होते. याला मुंबईकरांनी तसेच महाराष्ट्रातील अनेक युवकांनी भरघोस प्रतिसाद दिला. छत्रपती संभाजीनगर येथे देखील ठाकरे गटाकडून सभेचे आयोजन…

Read More

वैद्य पराग दाते यांना 'यशस्वी युवा वैद्य' पुरस्कार:ज्येष्ठ वैद्य धोपेश्वरकर म्हणाले, आयुर्वेदात निदानाचे महत्त्व सर्वाधिक

पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात रत्नागिरीचे आयुर्वेदाचार्य वैद्य पराग दाते यांना ‘यशस्वी युवा वैद्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नामांकित आयुर्वेद वाचस्पती वैद्य त्रिलोक धोपेश्वरकर यांनी आयुर्वेदात निदानाच्या सर्वोच्च महत्त्वावर भर दिला. वैद्य धोपेश्वरकर म्हणाले की, रुग्णाला नेमके काय झाले आहे, याचे अचूक निदान, योग्य युक्ती आणि प्रभावी चिकित्सा या तिन्ही गोष्टींचा योग्य समन्वय…

Read More

गर्भवती महिलेवर दुर्मिळ स्तन कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया:पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे डॉक्टरांनी वाचवले आई-बाळाचे प्राण

पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे एका २६ आठवड्यांच्या गर्भवती महिलेवर दुर्मिळ प्रकारच्या स्तन कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेत गर्भधारणा कायम ठेवून महिलेच्या उजव्या स्तनाची मास्टेक्टॉमी करण्यात आली. सध्या आई आणि गर्भातील बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. लोणावळा परिसरातील २७ वर्षीय महिलेला सुमारे सहा महिन्यांपूर्वी उजव्या स्तनामध्ये गाठ जाणवली होती….

Read More

श्रीकांत शिंदे केंद्रीय शिक्षणमंत्री होणार?:खासदार सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितले; काय म्हणाले? वाचा सविस्तर

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळाले असून, या महत्त्वपूर्ण घडामोडीनंतर आता एक नवीन राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आला असला तरी, भविष्यात या पदावर खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागू शकते का, या सुरू असलेल्या चर्चेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते…

Read More

राहुल गांधींना पंतप्रधान निवासावर घातपात घडवायचा होता:महाराष्ट्राने नाकारलेले लोक दिल्लीत जाऊन आगीत तेल ओतत होते – एकनाथ शिंदे

‘नीट’ परीक्षा घोटाळा ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ कठोर पावले उचलली आहेत. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी उद्या संसदेत नवा कायदा मांडला जाणार असून, त्यात १० वर्षांची सक्तमजुरी आणि १० कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद असणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे आंदोलन हे मूळतः अराजकीय होते; मात्र राहुल गांधी आणि…

Read More

अकोल्यात शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाचा मृत्यू:पक्षांतर्गत वादातून माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात घडवल्याचा नातेवाईकांचा आरोप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला केवळ एक अपघात वाटणाऱ्या या घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले असून, हा साधा अपघात नसून पक्षाच्याच माजी जिल्हाप्रमुखाने रचलेला हत्येचा हा एक सुनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप मृत नेत्याच्या कुटुंबीयांनी केला…

Read More

मंत्री संजय शिरसाट थेट दिपकेंच्या घरी:म्हणाले- अभिजितच्या आंदोलनावर अनेक पक्षांनी आपली राजकीय पोळी भाजली

दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘नीट’ पेपरफुटीविरोधात ऐतिहासिक आंदोलन उभे करून थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या अभिजित दिपके यांच्या कुटुंबीयांची मंत्री संजय शिरसाट यांनी भेट घेतली. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे अध्यक्ष असलेल्या अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन शिरसाट यांनी त्यांच्या आई-वडिलांशी प्रदीर्घ चर्चा केली. या भेटीदरम्यान त्यांनी अभिजितचे कौतुक करत त्याला पोलिस संरक्षण मिळवून…

Read More

वाघापासून वाचण्यासाठी महावितरण कर्मचारी विजेच्या खांबावर:ताडोबा सीमेवरील फुलझरी गावात घडला थरारक प्रसंग

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या सीमेवरील फुलझरी गावात महावितरण कर्मचाऱ्यांनी वाघापासून आपला जीव वाचवण्यासाठी थेट विजेच्या खांबावर चढून एक तास घालवल्याची थरारक घटना समोर आली आहे. या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे. महावितरणचे कर्मचारी नेहमीप्रमाणे फुलझरी गावात विजेच्या वाहिन्यांची दुरुस्ती करत होते. काम सुरू असतानाच अचानक झुडपातून एका वाघाने शांतपणे प्रवेश केला. वाघ समोर आल्याचे…

Read More

'एका झुरळाने हुकूमशहाला हरवले':जल्लोष सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, 'खड्डा मंत्री' म्हणत नितीन गडकरींनाही डिवचले

विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारलाही झुकावे लागले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा मुंबईच्या सावरकर मार्गावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मी देशातील…

Read More

अमित शहा अन् फडणवीसांच्या आदेशानेच आंदोलकांवर क्रूर अत्याचार:महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हे तर शहाच- हर्षवर्धन सपकाळ

दिल्लीमधील आंदोलनात एकीकडे क्रुर तर दुसरीकडे विकृत असे वर्तन केंद्राच्या आणि राज्याच्या गृह विभागाकडून बघायला मिळाले. जर गृहविभाग असे कृत्य करतो आणि कोणतीच कारवाई होत नाही, त्यावेळी गृहमंत्र्यांचाच त्या कारवाईसाठी आदेश असेल याची शक्यता नाकारता येत नाही, ही शक्यता असल्याने कोणत्याच पोलिसांवर कारवाई करण्यात आली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. देवेंद्र…

Read More