Headlines

अकोटच्या कालंका माता मंदिर चोरी प्रकरणाचा छडा:गुन्हे शाखेचा पोलिस महासंचालकांकडून सन्मान

अकोट येथील सुप्रसिद्ध कालंका माता मंदिरात झालेल्या लाखो रुपयांच्या चोरीचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या प्रकरणाचा तपास केल्याबद्दल राज्याच्या पोलिस महासंचालकांनी मुंबईत एलसीबीच्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मान केला. पोलिसांच्या माहितीनुसार २२ फेब्रुवारी रोजी अकोटमधील बारागण येथील कालंका माता मंदिरातून अज्ञात चोराने देवीच्या मूर्तीवरील ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने व दानपेटीतील ७५० ग्रॅम चांदी,…

Read More

शिक्षक दारोदारी; बीएलओ कामांमुळे शैक्षणिक नुकसान:उजनीसह परिसरातील शाळांमध्ये गुणवत्तेवर परिणाम, पालकांमधून व्यक्त होतोय तीव्र संताप‎

तालुक्यातील शाळांमध्ये आधीच शिक्षकांच्या जागा रिक्त असताना, आता शिल्लक शिक्षकांना निवडणूक विभागाच्या ‘बीएलओ’ (मतदार नोंदणी अधिकारी) कामाला जुंपण्यात आले आहे. याचा थेट आणि प्रचंड मोठा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत असून, उजनी परिसरातील पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या उजनीसह परिसरातील बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. एकाच शिक्षकाला दोन ते तीन वर्ग सांभाळत…

Read More

नाझरेच्या काझींची मराठी पाठ्यपुस्तकात कथा:शैक्षणिक गोवा राज्यातील हजारो विद्यार्थी साहित्याचा करणार अभ्यास‎

सांगोला तालुक्यातील नाझरे गावचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक व बालसाहित्यकार फारूक एस. काझी यांच्या साहित्याला मोठा सन्मान मिळाला आहे. गोवा राज्याच्या इयत्ता सहावीच्या ‘सुलभ गोमंत भारती’ या मराठी पाठ्यपुस्तकात त्यांच्या कथेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गोव्यातील हजारो विद्यार्थी आता त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणार आहेत. गोवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) प्रकाशित या पाठ्यपुस्तकात…

Read More

Father quits illegal liquor business for one word from beloved daughter

. “बाबा, तुम्ही दारू विकू नका… शाळेत मला सगळे ‘दारूवाल्याची मुलगी’ म्हणून हिणवतात…” एका १५ वर्षांच्या निरागस मुलीने डोळ्यात अश्रू आणून आपल्या बापाला घातलेली ही साद… आणि या भावनिक आग्रहाने एका कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गावाचे चित्र बदलून गेले. तालुक्यातील लिंगदेव गावात समाजपरिवर्तनाची एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना घडली. गावात अवैध दारू विकणारे पिनू ऊर्फ…

Read More

एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात तरुणीचा गळा चिरून निर्घृण खून:नाशिकमधील इंदिरानगरातील उद्यान परिसरातील घटना

इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीतील उद्यानाजवळ शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास तरुणीच्या खुनाची घटना उघडकीस अाली. एकतर्फी प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला अाहे. खून केल्यानंतर हल्लेखोर प्रियकर फरार झाला असून, इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या पथकाकडून त्याचा शाेध सुरू आहे. वैष्णवी अावारे (२०) असे या तरुणीचे नाव अाहे. याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, तरुणीचा…

Read More

26 वर्षांपासून नि:स्वार्थ सेवा:वारकऱ्यांना दररोज 12 हजार कप आयुर्वेदिक चहाचे वाटप

आषाढी वारी म्हणजे भक्ती, सेवा आणि समर्पणाचा संगम. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी पैठणच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून मोफत आयुर्वेदिक चहा, शुद्ध पिण्याचे पाणी आणि बिस्किटांचे वाटप अखंडपणे सुरू आहे. वारीदरम्यान पाऊस, ऊन, वारा तसेच अशुद्ध पाण्यामुळे अनेक वारकऱ्यांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांसारख्या त्रासांना सामोरे जावे…

Read More

कारवाई:कोर्टाच्या तारखेला गैरहजर राहणाऱ्या 27 जणांवर गंगापूर पोलिसांची धडक कारवाई

गंगापूर विविध प्रकरणांमध्ये न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या तारखेला वारंवार गैरहजर राहणाऱ्या आरोपींविरोधात गंगापूर पोलिसांनी मोहीम राबविली आहे. पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष मोहीम आखून ३५ न्यायालयीन वॉरंटपैकी २७ व्यक्तींना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. गंगापूर तसेच छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या विविध खटल्यांमध्ये हजर राहण्याचे आदेश असतानाही संबंधित आरोपी सतत…

Read More

गौरव:ढाकेफळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा जिल्हा पातळीवर गौरव

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त पैठण तालुक्यातील ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य व शिक्षण समिती सभापती यांच्या हस्ते मंगळवारी वेरूळ सभागृहात आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र ढाकेफळ येथे सन २०२५-२६ या वर्षात जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक:19.50 कोटींच्या थकीत ऊस बिलासाठी पैठणला जलकुंभावर 13 तास आंदोलन

तालुक्यातील संत एकनाथ-सचिन घायाळ शुगर इंडस्ट्रीज यांनी २०२५-२६ च्या गाळप हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १९ कोटी ५० लाखांची एफआरपी थकविल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, पवन शिसोदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी ६ वाजेपासून पैठण तहसील कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून १३ तास आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी महसूल प्रशासनाने कारखान्याची जप्ती व लिलाव…

Read More

नीट:देशामध्ये मुलींत प्रथम आलेल्या पुण्याच्या श्रावणीने 2 वर्षे मोबाइलला हात नाही लावला, जि.प. शिक्षक दांपत्याच्या मुलीची झेप

दौंड तालुक्यातील खडकीची श्रावणी कृष्णा कुदळे हिने ‘नीट यूजी-२०२६’ मध्ये ७२० पैकी ७१० गुण मिळवत देशात ५ वा क्रमांक पटकावला आहे. ती देशात मुलींमध्ये पहिली, तर महाराष्ट्रासह ओबीसी प्रवर्गात अव्वल ठरली. यश मिळवण्यासाठी तिने २ वर्षे मोबाइल व सोशल मीडियापासून दुरावा ठेवला आणि मागील १० वर्षे घरात टीव्ही न पाहता कठोर परिश्रम घेतले. श्रावणीचे आई-वडील…

Read More