Headlines

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती!:उच्च शिक्षण संचालनालयाचे सर्व कॉलेजला आदेश

राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. हा लाभ शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू होणार असून त्याच्या अंमलबजावणीचे आदेश सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक तांत्रिक बदल केले जाणार असून १६ प्रकारच्या शैक्षणिक लाभांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क आणि कॅपनंतरच्या प्रवेशांनाही सवलती मिळणार आहेत. यातून उच्च…

Read More

सावधान ! शुभमंगलांना सिंहस्थात 3 महिने विराम:सिंहस्थ पर्वाची सुरुवात होताच नेहमीच्या मुहूर्तांना लागणार ब्रेक

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुरूचा सिंह राशीत प्रवेश होताच नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ पर्वाला प्रारंभ होणार आहे. या दिवसापासून ते २४ जानेवारी २०२७ पर्यंत विवाहासह बहुतांश मंगल कार्यांसाठी नियमित शुभमुहूर्त नसल्याने राज्यभरातील हजारो विवाह पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. परिणामी विवाह हॉल, केटरर्स, डेकोरेशन, बँड, फोटोग्राफी आणि इतर विवाहाशी संबंधित व्यवसायांवरही या कालावधीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त…

Read More

विद्यापीठांनी रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत:शिक्षणासोबत कौशल्यांचे एकत्रिकरण आवश्यक – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी विद्यापीठांना आवाहन केले आहे की, त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ सध्याच्या नोकऱ्यांसाठीच नव्हे, तर भविष्यातील संधींसाठीही तयार करावे. शिक्षणासोबत कौशल्यांचे एकत्रिकरण अत्यंत महत्त्वाचे असून, त्याद्वारे रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत, असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे…

Read More

भाजपने म्हटले- महाराष्ट्रात NCPचे दोन्ही गट एकत्र यावेत:त्यानंतर NDA मध्ये सामील व्हा; केंद्रीय मंत्रिमंडळात दोन पदांचीही ऑफर

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. त्यांना एकत्र येण्याची ऑफर एनडीएने दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार यावेळी संसदेत महिला आरक्षण विधेयक आणि परिसीमन विधेयकाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक आणणार आहे. म्हणूनच एनडीएच्या पक्ष नेतृत्वाने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) च्या दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र येऊन एनडीएचा सहयोगी…

Read More

पुणे गुन्हेगारी वाढली:गृह खात्याने तातडीने उपाययोजना कराव्यात, राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे पोलिस महासंचालकांना निवेदन

पुणे शहर आणि उपनगरांमधील वाढत्या गुन्हेगारीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे केली आहे. गृह खात्याने या गंभीर परिस्थितीची दखल घ्यावी, असे या शिष्टमंडळाने म्हटले. शुक्रवारी दाते यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात पुण्यातील महिलांवरील अत्याचार, बलात्कार, विनयभंग, कौटुंबिक हिंसाचार, सायबर गुन्हे, अमली पदार्थांची विक्री,…

Read More

निपुण भारत अभियानांतर्गत 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा:चार हजार गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांचे विशेष मार्गदर्शन – जिल्हाधिकारी

हिंगोली जिल्ह्यात निपुण भारत अभियानांतर्गत शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांसाठी गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दर्जेदार मार्गदर्शन देण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांची चाळणी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यातून निवड करण्यात येणाऱ्या चार हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, नवोदय व एनएमएमएस परीक्षांची विशेष तयारी करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज…

Read More

मौनाचा महामेरू हरपला!:संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; गुंज येथील कालिदास महाराजांचे निधन, भावजयीचाही मृत्यू

मराठवाड्याच्या आध्यात्मिक विश्वावर आज पहाटे काळाने अत्यंत मोठा आणि घाला घातला. तब्बल चार दशके (40 वर्षे) अखंड मौनव्रत धारण करून शब्दांशिवाय लाखो भाविकांच्या आयुष्याला दिशा देणारे, दत्त संप्रदायाचे श्रद्धास्थान परमपूज्य कालिदास महाराज यांचे बीड बायपासवर झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले. अपघातात कालिदास महाराज यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही जागीच मृत्यू झाला आहे….

Read More

Nagpur Hindutva Capital Says Sanjay Raut; Targets BJP Over Ramraksha Path

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी नागपूरला हिंदुत्वाची राजधानी म्हटले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्याबद्दल आदर असल्याने त्यांना ‘रामरक्षा पठण’ कार्यक्रमाचे निमंत्रण देणे आपले कर्तव्य असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. नागपूर . राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रामभक्त आणि कारसेवक म्हणून या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. हे काही लग्नाचे…

Read More

टाटा स्टील कलर्सचा पंढरपूर वारीत सहभाग:वारकऱ्यांसाठी सुविधा, सांस्कृतिक संवाद साधणार

टाटा स्टील कलर्सने पंढरपूर वारीमध्ये सहभाग घेऊन समाजाशी संवाद साधण्याचा विशेष उपक्रम सुरू केला आहे. व्यावसायिक उपक्रमांपलीकडे जाऊन समाजाशी अर्थपूर्ण नाते निर्माण करण्याच्या उद्देशाने हा जनसंपर्क कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे वारी मार्गावरील विविध ठिकाणी स्थानिक लोकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. सातशे वर्षांहून अधिक जुनी पंढरपूर वारी ही श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक…

Read More

जिथे जेवाल तिथेच छेद कराल!:सुनील तटकरेंवर रामदास कदमांची टीका, जयंत पाटलांच्या भेटीवरही स्पष्ट केली भूमिका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे नेते जयंत पाटील यांनी घेतलेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले असतानाच, शिवसेना नेते रामदास कदम यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली. मात्र, जयंत पाटील यांच्या भेटीत कोणतेही संशयास्पद राजकारण पाहण्याचे कारण नसल्याचे सांगत त्यांनी त्यांची पाठराखण केली. रामदास कदम म्हणाले की,…

Read More