Headlines

धावत्या एसटी बसला भीषण आग:संभाजीनगरहून इचलकरंजीला जात होती बस; चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका

छत्रपती संभाजीनगर–इचलकरंजी एसटी बसला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बसमध्ये 38 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाचे प्रसंगावधान आणि बाजूने जाणाऱ्या कारमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना वेळेत बसमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. गोदावरी हॉटेलजवळ धावत्या बसला आग ही घटना छत्रपती संभाजीनगर-बीड महामार्गावरील पिंपळगाव पांढरी फाटा परिसरात, गोदावरी हॉटेलजवळ सकाळी…

Read More

भगवे फडकवण्याच्या वेळी तुम्ही पाकिस्तानचे झेंडे फडकवलेत:रामाच्या नावाने राजकारण करणाऱ्या ठाकरेंवर चंद्रशेखर बावनकुळे कडाडले

राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना विरोधकांकडून जाणीवपूर्वक महायुतीबद्दल अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ‘महाविकास आघाडीतील नेते एकमेकांचे चेहरे बघायलाही तयार नाहीत, अशी वाईट स्थिती महायुतीमध्ये अजिबात नाही,’ असे म्हणत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. तसेच, अयोध्येतील राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

Read More

शिंदे 48 तासांत दुसऱ्यांदा दिल्लीत शाहांच्या भेटीला:केंद्र, राज्यात मंत्रिपदे मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली दौऱ्यावर गेले. गेल्या ४८ तासांतील हा त्यांचा दुसरा दौरा आहे. याआधी १४ जुलै रोजी ते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना भेटले होते. उद्धवसेनेच्या सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिल्लीत शिंदेंची ताकद वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद…

Read More

अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा:नांदगावी उपवर्गीकरण संघर्ष समितीतर्फे आंदोलन करत प्रशासनास निवेदन‎

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी उपवर्गीकरण संघर्ष समिती, नांदगावच्या वतीने शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय संविधानातील समानता, सामाजिक न्याय आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडण्याची तसेच सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे…

Read More

'हिंदूंच्या श्रद्धेला तडा गेलाय, त्यांना ऊर्जा देण्याची गरज':मोहन भागवतांना रामरक्षा आंदोनाचे निमंत्रण देत राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘रामरक्षा’ ही राज्यव्यापी चळवळ उभी केली आहे. या उपक्रमांतर्गत १८ जुलै २०२६ रोजी नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण खासदार संजय राऊत यांनी काल (१५ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे दिले होते. त्यानंतर आता राऊत यांनी थेट राष्ट्रीय…

Read More

दिलासा:संत नरसिंग महाराज मंदिर परिसरातील दुरुस्तीला सुरुवात, साचणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या समस्येतून भाविक, नागरिक अन् व्यापाऱ्यांना मिळणार मुक्ती

शहरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री संत नरसिंग महाराज मंदिर परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे भाविक, नागरिक आणि स्थानिक व्यापाऱ्यांना दरवर्षी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधणारे वृत्त “दिव्य मराठी’त ५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतली असून, मंदिर परिसरातील रस्ता व जलनिस्सारण व्यवस्थेच्या दुरुस्तीच्या कामाला…

Read More

अखेर पावसाची प्रतीक्षा संपणार?:राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट; 20 जुलैनंतर मान्सून आणखी सक्रिय होण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला असून, पुढील दोन-तीन दिवसांत अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली…

Read More

शालेय गणवेशाचे अनुदान 300 वरून 500 रुपये करणार:जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय, शिक्षणाचा दर्जा उंचावणार‎

देशपातळीवर गौरव मिळविलेल्या सांगोला तालुक्यातील शेळकेवाडी (शिवणे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या यशस्वी शैक्षणिक मॉडेलचा विस्तार आता संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीच्या बैठकीत शालेय गणवेशाचे अनुदान ३०० वरून ५०० रुपये करण्याचा ठराव, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उपस्थिती भत्त्यात पाचपटीने वाढ, तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विशेष भरारी पथक स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला….

Read More

White Grub Management Workshop in Bhansahivare

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनई येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषिसंबंधी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत आज भानसहिवरे येथे शेतकऱ्यांसाठी हुमणी अळी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन आणि चर्चासत्र उत्साहात प . यावेळी महाविद्यालयाचे डॉ. संतोष चौगुले यांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व हुमणी अळी व प्रा. नरेंद्र दहातोंडे यांनी हुमणी अळीच्या जीवनचक्राची…

Read More

पूर्णवेळ अभियंता अन् 8 तास वीजेसाठी शेतकरी आक्रमक:मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार‎

काही दिवसांपासून महावितरणकडून शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत अनियमित होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून महावितरणच्या सात्रळ सबस्टेशनच्या आवारात किरण कडू यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालू राहणार असल्याचे सांगितले. आंदोलक शेतकरी तसेच ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन डेप्युटी इंजिनियर पाटील तसेच सब स्टेशनचे सब इंजिनियर दिलीप गाढे यांना दिले. सात्रळ…

Read More