Headlines

White Grub Management Workshop in Bhansahivare



मुळा एज्युकेशन सोसायटीच्या सोनई येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषिसंबंधी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत आज भानसहिवरे येथे शेतकऱ्यांसाठी हुमणी अळी व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन आणि चर्चासत्र उत्साहात प

.

यावेळी महाविद्यालयाचे डॉ. संतोष चौगुले यांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व हुमणी अळी व प्रा. नरेंद्र दहातोंडे यांनी हुमणी अळीच्या जीवनचक्राची माहिती देऊन तिच्या प्रतिबंधात्मक उपाय तर प्रा. जयसिंग वाघमारे यांनी जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी उपाययोजना व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि डॉ. राजेंद्र लिपणे यांनी पिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि हुमणी अळीमुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनिल बोरुडे, प्रा. अनुप दरंदले आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.

चर्चासत्रात येथील शेतकरी राजेंद्र ढवाण, सुरेश ढवाण, किशोर ढवाण, विश्वनाथ चव्हाण, किशोर कदम, मधुकर भणगे, भाऊसाहेब काळे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे ”कृषिदूत” प्रणव जावळे, ओम कवडे, पीयूष माने, ओंकार भांड आणि वैष्णव कोल्हे यांनी विशेष परिश्रम घेतले. ओंकार भांड याने प्रास्ताविक केले, तर किशोर भणगे यांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *