![]()
संत जगद्गुरू तुकाराम महाराज, संत सोपानकाका, संत चांगवटेश्वर यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात दि. २० जुलै रोजी आगमन होत असून, जिल्हा प्रशासन व नगरपरिषदेच्या वतीने या पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा हा या पालखी सोहळ्याच्या प्रवासातील अंतिम टप्पा आहे. दि. १९ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी धर्मपुरी येथे, तर दि. २० रोजी संत तुकाराम महाराज, संत सोपानकाका तसेच संत चांगवटेश्वर या पालख्या अकलूज येथे जिल्हा प्रवेश करणार आहेत. त्यादृष्टीने ग्रामविकास विभागाच्या वतीने धर्मपुरी व अकलूज नीरा नदीजवळ भव्य स्वागत कमानी उभारल्या आहेत. त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण २० जुलै रोजी पुरंदावडे येथे, तर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण त्याच दिवशी सकाळी ११ वाजता अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. तुकोबारायांच्या पालखीचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी येथे होत असल्याने बहुतांश दिंड्या आदल्या दिवशीच अकलूजमध्ये मुक्कामी येतात. पाणीपुरवठा: शहरात २४ तास पाणी उपलब्ध राहणार असून दररोज सुमारे ६ एमएलडी पाणी पुरविले जाईल. २४ सार्वजनिक बोअरवेल, एक विहीर आणि सहा टँकरद्वारे पाण्याची सोय केली आहे.
Source link
नीरा काठी संतांच्या वेशभूषेत नेत्यांच्या छबी:शासन खर्चातून प्रचार, तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे पहिले गोल रिंगण अकलूजमध्ये रंगणार