Headlines

कुसुमकोटमध्ये माजी विद्यार्थी शाळांच्या मदतीसाठी पुढे:'मेळघाट शिक्षण लोकसंवाद' अभियानांतर्गत घेतला पुढाकार

मेळघाटच्या धारणी तालुक्यातील कुसुमकोट येथील शाळांच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. ‘खोज’ संस्थेच्या ‘मेळघाट शिक्षण लोकसंवाद’ कार्यक्रमांतर्गत नुकताच मोंटफोर्ट शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गावातील सर्व शाळांच्या विकासासाठी मदतीचा हात पुढे करण्यात आला. ‘खोज’ संस्थेने हाती घेतलेला ‘मेळघाट शिक्षण लोकसंवाद’ कार्यक्रम केजी ते पीजी शिक्षण भक्कम आणि दर्जेदार असावे यासाठी…

Read More

अमरावती विभागीय क्रीडा संकुलात कचऱ्याचे ढिग:खेळाडूंच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह, सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलात काही ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. विशेष म्हणजे, हा कचरा संकुलाच्या आतील नसून तो बाहेरून आणून टाकण्यात आला आहे. यामुळे क्रीडा प्रबोधिनीअंतर्गत वास्तव्यास असलेल्या खेळाडूंचे आणि सकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, येथील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या काही नागरिकांनीच संकुलातील कचऱ्याचा विषय समोर…

Read More

अंजनगाव सुर्जी खरीप बैठक:राजकारणामुळे शेतकरी संतप्त, अर्ध्यातूनच परतले; कृषी मार्गदर्शनाऐवजी राजकीय चर्चा, कृषी विभागावर प्रश्नचिन्ह

अंजनगाव सुर्जी येथे आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत कृषी मार्गदर्शनाऐवजी राजकीय चर्चा अधिक झाल्याने अनेक शेतकरी संतप्त होऊन बैठकीतून अर्ध्यातच निघून गेले. या प्रकारामुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी विभागामार्फत सिद्धेश्वर मंगलम येथे ही तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार गजानन लवटे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीचा उद्देश शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तांत्रिक…

Read More

पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला:मनमाडमध्ये नाशिकच्या तरुणाचा, तर अमरावतीत 'रील' बनवताना 4 जणांचा बुडून मृत्यू

उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी स्विमिंग पूल आणि तलावांवर पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच, दोन भीषण दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. मनमाडमध्ये लग्नासाठी आलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला, तर अमरावतीमध्ये रील बनवण्याच्या नादात चार मुला-मुलींना तलावात जलसमाधी मिळाली. मातृदिनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लग्नासाठी आला अन् काळाने…

Read More

वसईत विवाह सोहळ्यानंतर तुंबळ हाणामारी:हुंड्यावरून आनंदाच्या सोहळ्यात वादाचे गालबोट, वधू-वर पक्षाकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

वसई पश्चिमेकडील एका विवाहसोहळ्यात आनंदाच्या वातावरणाला हुंडा आणि देण्या-घेण्याच्या वादाचे गालबोट लागले आहे. किरकोळ वादातून सुरू झालेली शाब्दिक चकमक इतकी विकोपाला गेली की, दोन्ही पक्षांतील मंडळींनी एकमेकांवर अक्षरशः हल्ला चढवला. या राड्याचा ‘लाईव्ह’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लग्नाचा मांडव जणू काही रणांगण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याप्रकरणी माणिकपूर पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी…

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरणात केवळ छोटे मासे समोर:मोठ्या माशांना मोठ्या रकमा घेऊन अलगद बाहेर काढण्याचा प्रकार सुरू – रोहित पवार

भोंदू अशोक खरात प्रकरणात सध्या केवळ छोटे मासे समोर आलेत. या प्रकरणात अनेक मोठे मासे आहेत. या प्रकरणाच्या तपासातून त्यांची नावे वगळण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या आरोपांमुळे या प्रकरणातील मोठे मासे कोण? असा…

Read More

वनीकरण विभागाची 'झाडाझडती'!:वृक्षारोपणातील गैरव्यवहारावरून जिल्हाधिकारी घेणार यंत्रणेची हजेरी, कागदपत्रांचीही होणार तपासणी

कळमनुरी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या कामांवरून आता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून यंत्रणेची हजेरी घेतली जाणार आहे. या कामांना प्रत्यक्ष भेटी देऊन कागदपत्रांची तपासणी देखील केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता वनीकरण विभागाचे गैरकारभार चव्हाट्यावर येणार असल्याचे बोलले जात आहे. कळमनुरी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपन कार्यक्रमात मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार…

Read More

औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा होणार कायापालट!:266 कोटींच्या विकास आराखड्याला सोमवारी मिळणार मंजुरी

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे विविध विकास कामांसाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून २६६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी ता. ११ पालक सचिव रिचा बागला यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामांना मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील भाविकांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. देशातील…

Read More

केंद्राची बंदी असताना नागपुरात दिला "तिहेरी तलाक':मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ; तहसील पोलिसांत पतीसह सासूवर गुन्हा

देशात ‘तिहेरी तलाक’ प्रथा कायद्याने गुन्हा ठरवूनही नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी जन्माला आल्याच्या कारणावरून एका विवाहितेचा छळ करून तिला पतीने तोंडी तिहेरी तलाक दिला. या प्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिसांनी पती इमरान रशीद शेख (वय 38) आणि सासू सईदा बेगम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रुक्सार शेख सोहेल शेख (वय 32) यांनी…

Read More

राज्यात कायद्याचा वचक राहिला नाही:मुख्यमंत्र्यांनी गृहखाते दुसऱ्याकडे सोपवावे; वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्याची प्रतिमा मलीन- बजरंग सोनवणे

राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनक रितीने वाढले असून, गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मुंबईचा देशात पहिला क्रमांक लागणे ही भूषणावह बाब नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे अनेक खाती ठेवून घेतल्यामुळे गृहखात्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांनी हे खाते दुसऱ्याकडे सोपवायला हवे होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सरकारवर तोफ डागली. बजरंग सोनवणे…

Read More