वादळाने वीज यंत्रणेचे नुकसान; पुरवठा खंडित, शहरातही फटका:मध्यरात्री शहरात तर तिवसा परिसरात दुपारी हलक्या पावसाची हजेरी
मागील तीन ते चार दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. त्या बदलामुळे उष्णतेच्या चटक्यांपासून अमरावतीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र शुक्रवारी ८ मे रोजी मध्यरात्री झालेल्या वादळामुळे शहरासह जिल्ह्यातील काही भागात वीज यंत्रणेला फटका बसला होता. त्यामुळे संबधित ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान शनिवारी ९ मे रोजी दुपारी तिवसा, गुरूदेवनगर, खोलापूर भागात वादळामुळे काही नुकसान…