शब्द पाळा, नाहीतर रस्त्यावरची मोठी लढाई:आंदोलन स्थगित करत रोहित पवारांचा सरकारला इशारा, 22 जूनपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निश्चित
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आणि कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात सुरू केलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत सरकारच्या वतीने शिष्टाई केली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन…