जिल्हाधिकारी आशिष येरेकर गुरुकुंज आश्रम पाहून मंत्रमुग्ध:राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे दर्शन घेत सामुदायिक प्रार्थनेत सहभाग
अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे दर्शन घेतले आणि सामुदायिक प्रार्थनेत सहभाग घेतला. आश्रम परिसर आणि आध्यात्मिक वातावरण पाहून ते मंत्रमुग्ध झाले. जिल्हाधिकारी येरेकर यांचा मोझरी ग्राम येथे ‘गावमुक्काम’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या नियोजित दौऱ्यानिमित्त त्यांनी सायंकाळी गुरुकुंज आश्रमास भेट…