Headlines

ठाकरे गटात पुन्हा भूकंप होणार?:खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत; संजय राऊत तातडीने दिल्लीला रवाना होणार




महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आलाय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संभाव्य फुटीच्या चर्चांनी जोर धरला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पक्षाच्या खासदारांची तातडीची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. बैठकीनंतर सर्व खासदार पक्षासोबत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला असला, तरी काही खासदार नव्या गटाच्या स्थापनेच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संजय राऊत तातडीने दिल्लीला रवाना सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाबाबत पत्र देण्याच्या तयारीत आहेत. याचदरम्यान काही खासदारांनी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री तथा शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मातोश्रीवरील बैठकीला काही खासदार अनुपस्थित राहिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. या सर्व घडामोडींमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती असून, पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *