Headlines

राजकीय आघाड्या मजबूत होतील, पण पक्ष विलीन होणार नाहीत:वेरुळमधील शिक्षकाचा मृत्यू म्हणजे पोलिसी गुंडशाहीचा कळस- अंबादास दानवे

सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या विविध पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी पूर्णविराम दिला आहे. कोणताही पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन होणार नाही, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसची काँग्रेससोबत केवळ आघाडी असून ती आगामी काळात अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची घेतलेली भेट…

Read More

मुंबईत मंत्रालयाबाहेर वंचितचे आंदोलन:NEET पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांचा आक्रोश, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

NEET परीक्षांमधील पेपरफुटी व गैरव्यवहारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्याच्या निषेधार्थ आज मंत्रालयाबाहेर मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. वंचित बहुजन आघाडी आणि ‘वंचित बहुजन युवा आघाडी’च्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर “विद्यार्थी आक्रोश मोर्चा” काढत जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार आणि परीक्षा घेणाऱ्या ‘NTA’ संस्थेविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मंत्रालयाबाहेर घोषणाबाजी…

Read More

एका दिवसात 94% परदेशी कर्ज फेडण्याची ताकद:पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान, मोदींच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीचे आकडेवारीसह केले समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्षे पंतप्रधानपद भूषवून विक्रमी टप्पा गाठल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला. यावेळी त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेपासून ते डिजिटल व्यवहारांपर्यंत विविध क्षेत्रांतील प्रगतीची आकडेवारी सादर करत देशाची आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दावा केला. फडणवीस म्हणाले की, भारत आज जगातील चौथी सर्वात मोठी…

Read More

काँग्रेस पक्षाला आता शेवटची घरघर लागली, तिथे कोणालाच किंमत नाही:शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर बावनकुळेंचा खोचक टोला

शरद पवार किंवा सुप्रिया सुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, असे मला वाटत नाही. आणि जरी त्यांनी तसा निर्णय घेतलाच, तर आमच्या त्यांना शुभेच्छा असतील. मात्र, काँग्रेसचा इतिहास काय आहे, हे शरद पवारांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. तिथे कोणालाही किंमत दिली जात नाही, अशा शब्दांत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा…

Read More

'काँग्रेस ही बुडती नाव, राष्ट्रवादी त्यात का विलीन होईल?:सध्या भाजप हाच त्यांच्यासाठी सर्वोत्तम 'चॉईस'- चंद्रकांत पाटील

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा काही विषय उरला नाही. त्यामुळे बातम्या चालवण्यासाठी काही तरी मुद्दा लागत असतो. मग त्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार का? अशा चर्चा घडत असतात. काही तरी चर्चा असते पण त्यामध्ये काही तथ्य नसते. कारण काँग्रेस ही बुडती नाव आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस का…

Read More

शेअर मार्केटमधील कोट्यवधींच्या तोट्याने संसार उद्ध्वस्त:नंदुरबारमधील मुख्याध्यापकाची 2 चिमुरड्यांसह पत्नीची हत्या करून आत्महत्या

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात कार्यरत असलेल्या एका प्राथमिक शिक्षकाने पत्नी आणि दोन लहान मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीद या मूळ गावी ही दुर्दैवी घटना घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांचा मृत्यू झाल्यानंतर शिक्षकानेही घेतला गळफास मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक तळोदा…

Read More

गायगाव देवस्थान “गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दुमदुमले:गायगावच्या प्राचीन श्री गणपती मंदिरात पहाटेपासून भक्तांच्या लांब रांगा‎

अधिक मास अर्थात धोंड्याच्या महिन्याचा समारोप जवळ आल्याने जिल्ह्यातील प्रसिद्ध व प्राचीन गायगाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. अधिक मासाचे शेवटचे दिवस असल्याने पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तांच्या लांबच लांब रांगा ला . हिंदू धर्मात अधिक मासाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या पवित्र काळात पूजा, अर्चना, जप आणि देवदर्शनाला भाविक प्राधान्य…

Read More

राज ठाकरे पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधणार नाहीत; ठाकरेंना-राऊतांनाही याची कल्पना:'काँग्रेसचे आणखी तुकडे होणार- नवनाथ बन

राज ठाकरे काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधणार नाही याची कल्पना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आहे. ते त्यांचा पक्ष उबाठामध्ये विलीन करणार नाही ही खात्री सुद्धा उबाठाच्या नेत्यांना आहे. राऊतांनी उबाठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. प्रादेशिक पक्ष मजबूत करण्याचा प्रश्न विचारल्यावर राऊत गप्प बसतात, कारण त्यांना माहिती आहे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे मजबूत होऊ नये,…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:1.66 कोटी बहिणींचे लाड, राज्यात एकल पालकांची 2.23 लाख मुले उपेक्षित, महिला-बालकल्याण विभागाचा दुजाभाव

राज्य सरकार एका बाजूला ‘लाडकी बहीण’ योजनेवर कोट्यवधींचा निधी खर्च करत असताना, दुसरीकडे राज्यातील 1 लाख 80 हजार एकल पालकांच्या 2 लाख 23 हजार बालकांना गेल्या वर्षभरापासून अनुदानाची प्रतीक्षा आहे. 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना, या अनाथ आणि निराधार मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. महिला-बालकल्याण विभागाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण व…

Read More

सांगलीत माथाडी नेत्याच्या घरात घुसून गोळीबार:14 वर्षांच्या नातवाचा जागीच मृत्यू, व्यावसायिक वादातून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

सांगली शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीच्या भरवस्तीत एका माथाडी नेत्याच्या घरात 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी घुसून अंधाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात माथाडी नेत्याच्या अवघ्या 14 वर्षांच्या निष्पाप नातवाचा गोळ्या लागून मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या या थरारनाट्यामुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे….

Read More