Headlines

12 वर्षीय मुलीच्या स्वादुपिंडाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी:अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयात डॉक्टरांना मिळाले यश

अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) १२ वर्षीय मुलीच्या स्वादुपिंडातील अत्यंत गुंतागुंतीची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे मुलीला नवजीवन मिळाले असून, तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. गाठीमुळे या बालिकेचे पोट वरच्या बाजूस सरकले होते. त्यामुळे तिला अन्न गिळण्यास, श्वास घेण्यास आणि चालण्यासही खूप त्रास होत होता. गॅस्ट्रोस्कोपी करतानाही अडथळे येत…

Read More

राजधानी एक्सप्रेसमधून 4.26 कोटींचे कोकेन जप्त:महिलेला अटक, नागपुरात DRI ची कारवाई; शॅम्पूच्या बाटल्यांतून सुरू होती तस्करी

राजधानी एक्सप्रेसमधून चाललेल्या एका मोठ्या ड्रग्ज तस्करीचा महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) पर्दाफाश केला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर केलेल्या या कारवाईत एका महिला प्रवाशाकडून तब्बल ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे ४.२६ कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून तिला न्यायालयीन कोठडी…

Read More

रात्रपाळीत झोपण्यावरून वाद:सुरक्षारक्षकाचा गमछाने गळा आवळून खून; खराडी पोलिसांकडून आरोपीला अटक

खराडी येथील एका सोसायटीच्या आवारात रात्रपाळीत झोपण्यावरून झालेल्या वादातून एका सुरक्षारक्षकाचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी एका सुरक्षारक्षक तरुणाला अटक केली आहे. पांडुरंग भाऊराव हरवणे (वय ५२, रा. मांजरी बुद्रुक) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी सुदर्शन माणिक काळे (वय २२, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) याला अटक करण्यात आली…

Read More

मुख्यमंत्री सहायता निधीला आता 8 तासांत मंजुरी:नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे रुग्णालय ते प्रशासकीय दिरंगाई टळणार, बाह्य हस्तक्षेप संपेल

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी आता निधीची प्रतीक्षा करावी लागणार नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने विकसित केलेल्या नव्या ऑनलाइन प्रणालीमुळे अवघ्या ८ कार्यालयीन तासांत मदतीचा अर्ज मंजूर होणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांवर अवलंबून न राहता रुग्णालयच पुढाकार घेणार आहे. आतापर्यंत कागदपत्रांची जुळवाजुळव व मंजुरीसाठी हेलपाटे मारण्यात रुग्णांच्या नातेवाइकांचा वेळ…

Read More

मुक्ताईनगरात बिबट्याला जमावाने लाठ्यांनी मारहाण करून पकडले:आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह जमावाने लाठ्या मारल्या

मुक्ताईनगर येथील शासकीय विश्रामगृह परिसरात रविवारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुमारे पावणेतीन तास थरार रंगला. वनविभागाने दोनदा बेशुद्धीचे इंजेक्शन देऊनही बिबट्या नागरी वस्तीकडे धावल्याने आमदार चंद्रकांत पाटील व जमावाने लाठ्याकाठ्यांच्या साहाय्याने त्याला रोखून धरले. अखेर दुपारी १२.४० वाजता बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. पहाटे ४ वाजेपासून कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे कर्मचाऱ्यांना बिबट्याचा संशय होता. सकाळी १० वाजता शेतकऱ्यांना इमारतीमागे…

Read More

NCERTकडून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याचा निर्णय:ही मराठ्यांच्या बलिदानाची प्रतारणा, छत्रपती संभाजीराजेंचा संताप

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या बदलामुळे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले असून, छत्रपती घराण्यासह शिवप्रेमी व इतिहासप्रेमींनी यावर अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास पुसण्याचा…

Read More

पुण्यात तरुणाचा खून, भवानी पेठेत धारदार शस्त्राने वार:पूर्ववैमनस्यातून घटना; खडक पोलिसांनी चौघांना केली अटक

पुण्यातील भवानी पेठेतील काशेवाडी भागात पूर्ववैमनस्यातून एका १८ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी खडक पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अबूबकर अमजद खान (वय १८, रा. एडी कॅम्प चौक, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अम्मार शेख (वय १९, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ), कमरअली…

Read More

महसूलमंत्र्यांच्या हस्ते लोणीकंद येथे समाधान शिबिराचे उद्घाटन:'विकसित भारत-2047' च्या संकल्पपूर्तीसाठी शासन प्रयत्नशील – बावनकुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत-२०४७’ च्या संकल्पपूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कल्याणकारी योजना पोहोचवण्यासाठी लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक निर्णय घेतले जात आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते लोणीकंद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित समाधान शिबिरात बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी…

Read More

राष्ट्रउभारणीसाठी संवाद, समन्वय आवश्यक – नरेंद्र ठाकूर:पुणे येथे 'धर्माचार्य परिषद' संपन्न; पंचपरिवर्तनावरही झाले प्रबोधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रउभारणीसाठी संवाद आणि समन्वयाची गरज अधोरेखित केली. पुणे येथे आयोजित ‘धर्माचार्य परिषदे’त ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. कैलास महाराज ढगे यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर प्रभावी प्रबोधन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘विद्यापीठ भाग’ आणि ‘धार्मिक श्रेणी संपर्क विभाग’ यांच्या वतीने पाषाण येथील पुणे…

Read More

महात्मा फुलेंच्या विचारातून समताधिष्ठित समाज निर्मिती शक्य:डॉ. महेबूब सय्यद

प्रतिनिधी | अहिल्यानगर शेतकरी, कष्टकरी आणि कामगार वर्गाला न्याय देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. आजच्या काळात त्यांच्या विचारांचे तंतोतंत अनुकरण केल्यास खऱ्या अर्थाने समताधिष्ठित समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन सामाजिक विचारवंत व समीक्षक प्रा. डॉ. महेबूब सय्यद यांनी केले. आत्मनिर्धार फाऊंडेशनच्यावतीने महात्मा जोतीराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथील…

Read More