Headlines

भोंदू खरात प्रकरण:28 दिवसांनंतर रूपाली चाकणकरांचे मौन सुटले, 'बदनामीचा कुटील डाव' म्हणत बीडमधील निनावी पत्राच्या चौकशीची मागणी

नाशिकमधील गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून आरोपांच्या कचाट्यात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. तब्बल २८ दिवसांनंतर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली बाजू मांडताना त्यांनी, हे संपूर्ण प्रकरण आपल्या कुटुंबाला बदनाम करण्याचा एक ‘कुटील डाव’ असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. तसेच, बीडमधून आलेल्या त्या निनावी…

Read More

डॉ. आंबेडकर जयंती: रा. स्व. संघाने केले अभिवादन:पुणे शहरासह प्रांतात विविध ठिकाणी स्वयंसेवकांचा सहभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुणे शहरासह संपूर्ण प्रांतात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित केले. संघाच्या सामाजिक समरसता गतिविधीच्या वतीने स्वयंसेवकांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस आणि पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. पुण्यात सिंहगड रस्त्यावर महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर आणि सिंहगड भाग संघचालक सचिन नागपुरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला….

Read More

आशाताईंच्या अंत्यसंस्कारावरून राजकीय युद्ध:मिलिंद देवरा राजकारणातील सर्वात खालच्या पातळीचा नमुना, कॉंग्रेसचे जोरदार प्रत्युत्तर

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. मात्र या दुःखद प्रसंगातही खासदार मिलिंद देवरा यांच्या एका वादग्रस्त ट्विटमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. देवरा यांनी काँग्रेसला उद्देशून केलेल्या टीकेवर महाराष्ट्र काँग्रेसने अत्यंत तिखट शब्दांत पलटवार केला असून, शिंदेंचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करणारा गद्दार मिलिंद देवरा हा राजकारणातील सर्वात…

Read More

महाडच्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष; अभ्यासक्रमात समावेश करा:मार्च 1927 मध्ये महाडच्या चवदार तळ्यावर केलेला सत्याग्रह मानवमुक्तीसाठीचा लढा हाेता‎

मानवी हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे पुकारलेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्ष आहे. सरंजामशाहीने हिरावून घेतलेली मानवी प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्यासाठी महाडमध्ये झालेल्या दोन परिषदांनी केवळ अस्पृश्यांच्याच नव्हे, तर भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला नवी दिशा दिली. या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेबांच्या त्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण करणे आणि हा इतिहास…

Read More

नागपुरात डेटिंग ॲपवरून मैत्री पडली महागात:हॉटेलचे बिल आले 35000, तरुणीने काढला पळ; मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

डेटिंग ॲप्सचा वाढता वापर फसवणुकीच्या घटनांना निमंत्रण देत असल्याचे नागपूरमधील एका धक्कादायक घटनेवरून समोर आले आहे. शहरातील सदर पोलिस स्टेशन हद्दीत एका तरुणीने डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाला हॉटेलमध्ये नेऊन त्याची तब्बल 35000 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर आलेल्या इतक्या मोठ्या बिलामुळे चक्रावलेल्या तरुणाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच…

Read More

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे शहरात वाहतूक बदल:जिल्हाधिकारी कार्यालय, लष्कर भागात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी (14 एप्रिल) पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, लष्कर भागातील अरोरा टॉवर्स, दांडेकर पूल आणि विश्रांतवाडी या प्रमुख भागांमध्ये वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी शहर आणि उपनगरातून मोठ्या संख्येने अनुयायी येतात. या गर्दीमुळे होणारी संभाव्य…

Read More

अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता:प्रणिती शिंदेंचा आरोप; सत्ताधाऱ्यांची नावं उघड होण्याची भीती? राजकीय वर्तुळात खळबळ

नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. अशोक खरातचा एन्काउंटर होण्याची शक्यता असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, या प्रकरणात अनेक प्रभावशाली लोकांची नावे समोर येण्याची शक्यता असून, ती बाहेर येण्यापूर्वीच त्याला संपवण्याचा प्रयत्न होऊ शकतो….

Read More

सामाजिक जाणिवेतून दिलेल्या सीएसआर निधीतून जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक सुविधा:डीपीसीमधून बांधलेल्या दोन वर्गखोल्यांचेही उदघाटन

हिंगोली येथील जिल्हा परिषद गणेशवाडी शाळेत सीएसआर निधीतून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून या सुविधांसह जिल्हा नियोजनमधून उभारण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे उदघाटन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मंगळवारी ता. १४ झाले. येथील जिल्हा परिषद गणेशवाडी शाळेत आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले….

Read More

पुण्यात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक:26 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एम.डी. (मेफेड्रोन) या अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 26 लाख 71 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विमानतळ पोलिस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना, पोलिस शिपाई हरी पुंडे आणि लालू कन्हे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली. खराडी बायपास चौकातून फॉरेस्ट पार्ककडे जाणाऱ्या…

Read More

हिंगोली जिल्ह्यातून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना पकडले:5 गुन्हे उघडकीस, इनोव्हा कारसह 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली शहरासह जिल्हाभरातून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना स्थानिक गुुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ता. 14 अटक केली आहे. त्यांच्याकडून इनोव्हा कार सह 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांनी जिल्हयातील पाच गुन्हयांची कबुली दिली आहे. या प्रकरणातील इतर साथीदारांचा शोध सुरु करण्यात आला आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरात मागील काही दिवसापासून जनावरे चोरीच्या घटना…

Read More