Headlines

खरातच्या ‘आर्थिक’ कुंडल्यांची पाेलखाेल:पहाटे 5 पासून ‘तृप्ताबाला’ बंगल्यावर 17 तास सर्च ऑपरेशन; मुंबईच्या पथकाकडून कागदपत्रांची तपासणी

लैंगिक अत्याचार प्रकरणात सध्या अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. खरातची बेहिशोबी मालमत्ता आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार समोर आल्यानंतर सोमवारी (दि. 13) अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाने संयुक्त कारवाई करत नाशिकसह राज्यातील 11 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. नाशिकमधील कर्मयोगीनगर येथील खरातचा ‘तृप्ताबाला’ बंगला आणि कॅनडा कॉर्नरमधील ‘ओक्स प्रॉपर्टी’च्या कार्यालयात…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. आंबेडकर जयंतीचा जल्लोष:'युद्ध नको बुद्ध हवा' शांतीसंदेशाने मिरवणुकीत वेधले लक्ष

छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमसैनिकांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. शहरात सर्वत्र ‘जय भीम’चा जयघोष दुमदुमत होता. मिरवणुकीत ‘युद्ध नको बुद्ध हवा’ या आशयाचे फलक लक्षवेधी ठरले. सध्याच्या इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर या शांतीसंदेशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. गया येथील अतिक्रमण आणि महाडच्या चवदार तळ्याचा देखावा हे देखील मिरवणुकीतील आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. या…

Read More

अचलपूरमध्ये अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य:मुस्लिम संघटनांकडून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी

अचलपूरमध्ये अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्ये केल्याप्रकरणी मुस्लिम संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपी अयान अहमद तनवीर अहमद आणि त्याच्या साथीदारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. अचलपूरचे काजी ग्यासूद्दीन यांच्या नेतृत्वाखाली विविध मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार यांना निवेदन सादर केले. संघटनांच्या मते,…

Read More

टेबलाखालून पैसे घेणाऱ्यांची आता खैर नाही:तहसीलदारच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही बसवा; ते कलेक्टरांच्या चेबरला जोडा, मंत्री बावनकुळेंचे आदेश

“प्रशासनाचे काम केवळ भाषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून दिसले पाहिजे. एखादी आलिशान प्रशासकीय इमारत उभी राहिली म्हणजे प्रशासन लोकाभिमुख झाले असे होत नाही. जर नवीन इमारतीतही टेबलाखालून पैसे घेण्याचे प्रकार थांबणार नसतील, तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा आणि त्याचे थेट संचलन (सर्व्हिलन्स) जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरशी जोडा,” अशा कडक शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर…

Read More

वनोजा बागेतील सोलर प्लांटला आग; कोट्यवधींचे नुकसान:आगीचे कारण अज्ञात, पोलिस तपास सुरू

अंजनगाव सुर्जी परिसरातील वनोजा बाग येथील सोलर प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात सोलर प्लेट्स जळून खाक झाल्या असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या दीड वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मजुरांनी सुरुवातीला आग विझवण्याचा…

Read More

काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी 'सृजन अभियान' सुरू:5 वर्षे अध्यक्ष राहिलेल्यांना संधी नाही; केवळ चर्चा की बदल, उत्सुकता

काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी ‘सृजन अभियान’ सुरू झाले आहे. याअंतर्गत राज्यभरात जिल्हा आणि शहर अध्यक्षांच्या बदलाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या आठवडाभरापासून काँग्रेसचे निरीक्षक स्थानिक पातळीवर चाचपणी करत आहेत. यामध्ये काँग्रेस नेते अतुल लोंढे, मुजाहीद खान, बाळासाहेब थोरात आणि ‘सृजन अभियाना’चे प्रभारी विवेक बन्सल यांचा समावेश आहे. या निवडीसाठी स्थानिक पातळीवर सर्व्हे…

Read More

महिला आरक्षण विधेयकावर काँग्रेसचा केंद्रावर राजकारणाचा आरोप:गोपाळ तिवारी म्हणाले – अंमलबजावणी 2029 पासूनच शक्य

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असताना, केंद्र सरकार सामाजिक समतेच्या ध्येयाला धक्का देणारे निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. तिवारी म्हणाले की, ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाद्वारे महिलांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राजकारण केले जात आहे. नरेंद्र मोदी सरकारने…

Read More

स्वरसम्राज्ञी आशा भोसले अन् संगमनेरचे जिव्हाळ्याचे नाते‎:सन 2014 मध्ये घेतली होती प्रकट मुलाखत, उलगडल्या होत्या अनेक आठवणी

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर व तालुक्याला मोठी सांस्कृतिक समृद्ध परंपरा लाभली आहे. बाळासाहेब थोरात यांनी ही वैभवशाली परंपरा जपताना सातत्याने विविध संत आणि कलावंतांना संगमनेरमध्ये बोलावून त्यांचा सन्मान केला आहे. सन २०१४ मध्ये पद्मभूषण स्वरसम्रा . जाणता राजा मैदान येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त तत्कालीन महसूलमंत्री…

Read More

अमरावती हादरले!:180 तरुणींचे लैंगिक शोषण आणि 350 अश्लील व्हिडिओ व्हायरल; आरोपी मोहम्मद अयाजला बेड्या

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात भाजप खासदार अनिल बोंडे यांनी संबंधित आरोपीने तब्बल 180 तरुणींचे शोषण करून त्यांचे 350 व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक आरोप केल्यानंतर पोलिसांनी…

Read More

पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य अभिवादन सोहळा:राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मान्यवरांनी महामानवाला वाहिली आदरांजली

पुण्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भव्य ‘संयुक्त अभिवादन’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मध्यवर्ती समिती’च्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत महामानवाला आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत…

Read More