Headlines

स्वरसम्राज्ञी आशा भोसले अन् संगमनेरचे जिव्हाळ्याचे नाते‎:सन 2014 मध्ये घेतली होती प्रकट मुलाखत, उलगडल्या होत्या अनेक आठवणी



अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर व तालुक्याला मोठी सांस्कृतिक समृद्ध परंपरा लाभली आहे. बाळासाहेब थोरात यांनी ही वैभवशाली परंपरा जपताना सातत्याने विविध संत आणि कलावंतांना संगमनेरमध्ये बोलावून त्यांचा सन्मान केला आहे. सन २०१४ मध्ये पद्मभूषण स्वरसम्रा

.

जाणता राजा मैदान येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून आशा भोसले लाईव्ह कॉन्सर्ट २०१४ मध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये स्वतः आशाताईंनी मराठी, हिंदी अशी विविध गाणी गायली. सुमारे लाखभर प्रेक्षकांची उपस्थिती, भव्य दिव्य स्टेज, अत्याधुनिक व दर्जेदार आसन व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, लाईट एलईडी अशा सर्व सुविधांमध्ये झालेला आशा कॉन्सर्ट २०१४ हा सर्वांच्या लक्षात राहिला. यावेळी आशा भोसले यांनी अमृत उद्योग समूहाला भेट देऊन विविध सहकारी संस्थांची पाहणी केली. यावेळी तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांब, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते आशा भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुधीर गाडगीळ यांनी आशाताई भोसले यांची प्रकट मुलाखत घेतली होती.

जानेवारी २०२३ मध्ये थोरात यांचा नागपूर येथे अपघात होऊन खांद्याला दुखापत झाली होती. यावेळी आशाताई यांनी अगदी आस्थेवाईकपणे दवाखान्यामध्ये जाऊन बाळासाहेब थोरात यांची चौकशी केली होती. २०२४ मध्ये झालेल्या जयंती महोत्सवाच्या वेळी सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये आशाताईंनी फोन करून बाळासाहेब थोरात यांची चौकशी केली होती. वयाच्या ९२ व्या वर्षी आशाताईंनी अखेरचा श्वास घेतला आणि संगमनेरकरांसाठी ही अत्यंत दुःखद घटना घडली. अनेक आठवणी संगमनेरकरांच्या पद्मभूषण स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या समवेत असल्याने जिव्हाळ्याचे नाते कायम राहिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *