Headlines

सामाजिक जाणिवेतून दिलेल्या सीएसआर निधीतून जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक सुविधा:डीपीसीमधून बांधलेल्या दोन वर्गखोल्यांचेही उदघाटन




हिंगोली येथील जिल्हा परिषद गणेशवाडी शाळेत सीएसआर निधीतून विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून या सुविधांसह जिल्हा नियोजनमधून उभारण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे उदघाटन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मंगळवारी ता. १४ झाले. येथील जिल्हा परिषद गणेशवाडी शाळेत आयोजित कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, गटशिक्षणाधिकारी दत्ता नांदे, विस्तार अधिकारी शेषराव असोले, केंद्रीय मुख्याध्यापक कुलदीप मास्ट, निकुंज गांजापूरवाले यांची उपस्थिती होती. हिंगोली येथील रहिवासी तथा पुणे येथील प्रसिध्द उद्योजक प्रशांत निलावार व सीमा निलावार यांच्या ऋचा ग्रुप तर्फे सामाजिक जाणिवेतून शाळेसाठी सीएसआर फंडातून पाच लक्ष रुपयांचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यामध्ये इंटरॲक्टिव्ह पॅनल, ऑल-इन-वन कंप्यूटर, लेजर प्रिंटर, दुरचित्रवाणीसंच, प्रोजेक्टर, स्क्रीन ट्रायपॉड देण्यात आले. त्यातून वर्गात बसविलेल्या साहित्याचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड साहेब यांच्या हस्ते झाले. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीमधून उभारण्यात आलेल्या दोन वर्गखोल्यांचे उदघाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या वतीने उपलब्ध झालेल्या अभ्यासाच्या व सोयी सुविधांचा पुरेपूर उपयोग घेऊन विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधावाी असे आवाहन करण्यात आले. या शिवाय शाळेच्या विविध उपक्रमाबद्दल कौतूक केले. प्रास्तविक मुख्याध्यापिका उषा कोटकर यांनी केले. सुत्रसंचालन हरिभाऊ मुटकुळे यांनी केले तर केंद्र प्रमुख असोले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी केंद्रीय मुख्याध्यापक कुलदीप मास्ट, मुख्याध्यापिका उषा कोटकर, विलास वाढवे, सीमा गवळी, भास्कर लांडगे, लता साळवे, विजय बांगर, हरिभाऊ मुटकुळे, पंडित अवचार यांनी पुढाकार घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *