Headlines

पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी 22 जून रोजी विशेष कॅम्प:न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुरंदर) प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांच्या महसुली, न्यायिक आणि अर्धन्यायिक प्रलंबित अडचणी सोडवण्यासाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता सासवड प्रांत कार्यालयात विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली हा कॅम्प होणार आहे. या कॅम्पमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाईल. आतापर्यंत सुमारे…

Read More

हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये बदल्यानंतर आता विभाग बदलीच्या हालचाली:सीईओ विवेक गायकवाड यांचा निर्णय

हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्या नंतर आता विभाग बदलीच्या हालचाली सुरू झाले असून याबाबत तातडीने आवश्यक माहिती सादर करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिल्या आहे. पुढील आठवड्यामध्ये विभाग बदली होणार असल्याची चित्र आहे. हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागांमधून कर्मचाऱ्यांच्या मागील महिन्यात बदल्या करण्यात आल्या. त्यासाठी बदली पात्र कर्मचाऱ्यांच्या याद्या…

Read More

विवाह सोहळ्यात महिलांना पहिल्या पंक्तीच्या मानाची परंपरा एक तपानंतरही कायम:पिंपळदरीत गावकऱ्यांच्या पुढाकारातून सुरू झाला उपक्रम

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी गावात सुमारे बारा वर्षापुर्वी एका विवाह सोहळ्यात महिलांच्या पंगतीसाठी दुपार झाली होती. बच्चेकंपनी महिलां शिवाय भोजन करण्यास तयार नव्हती. मात्र पहिली पंगत पुरुषांची असल्याने कोणीही बोलण्यास तयार नव्हते. त्यानंतर गावातील तरुणाईने पुढाकार घेऊन यापुढील विवाह सोहळ्या व इतर धार्मिक कार्यक्रमात पहिल्या पंगतीला महिलांचा मान असेल असे जाहिर करून टाकले त्यानंतर आज…

Read More

आम्हाला येड्यात काढू नका, निर्णय लवकर मार्गी लावा!:आमदार लाड यांच्या भेटीनंतर जरांगेंचा सरकारला इशारा; जीआर डावलून फी उकळणाऱ्या शाळांवर कारवाईचे लाड यांचे आश्वासन

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यात पुन्हा एकदा संवादाचा सेतू बांधला जात आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान लाड यांनी सरकारच्या आतापर्यंतच्या कामांचा संपूर्ण ‘प्रोग्रेस रिपोर्ट’ कागदपत्रांसह जरांगे यांच्यासमोर मांडला. यावर जरांगे यांनी सरकारच्या काही निर्णयांचे मोकळेपणाने कौतुक…

Read More

Solapur Shiv Sainiks Perform Shraddh for Uddhav Thackerays 6 Rebel MPs

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे 6 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदेंच्या या ‘ऑपरेशन टा . सोलापुरात शिवसैनिकांचा उद्रेक, घातले खासदारांचे श्राद्ध पक्षाशी प्रतारणा केल्याच्या भावनेतून सोलापूरचे शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर…

Read More

राऊतांनी भाजपचा एक कार्यकर्ता तरी फोडून दाखवावा:भाजपचे तुकडे करण्याची भाषा हास्यास्पद, राऊतांचा पक्ष औरंगजेबाच्या चरणावर अर्पण- नवनाथ बन

संजय राऊत यांनी भाजपचा एक कार्यकर्ता तरी फोडून दाखवावा. रोज कार्यकर्ते, नगरसेवक आणि पदाधिकारी उबाठा गट सोडत असताना भाजपचे तुकडे करण्याची भाषा हास्यास्पद आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तर प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपवून त्यांना काँग्रेसमध्ये विलीन करण्याची काँग्रेसची जुनी भूमिका आहे. संजय राऊत हेही त्याच अजेंड्यावर काम करत असून महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा…

Read More

निम्मा जून संपला तरी पावसाची प्रतीक्षाच:जुलै ते नोव्हेंबर हे 5 महिने देशासाठी अत्यंत आव्हानात्मक, मुंबई-पालघरसह 17 जिल्ह्यांमध्ये दमट हवेचा त्रास वाढणार

यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मान्सून) 6 जून रोजी तळकोकणात प्रवेश केला. त्यानंतर 8 जूनपर्यंत मान्सूनने रत्नागिरीतील हर्णे, सातारा आणि सोलापूर परिसरापर्यंत मजल मारली. त्यामुळे राज्यभरात लवकरच पावसाची धूम सुरू होईल, अशी आशा होती. मात्र, त्यानंतर मान्सूनची प्रगती पूर्णपणे ठप्प झाली असून महाराष्ट्रातील मोठा भाग अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान तज्ज्ञांच्या…

Read More

'आगे आगे देखो होता है क्या!':6 खासदारांनंतर आता 14 आमदारही फुटणार? शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा खळबळजनक दावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असतानाच आता ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक दावा समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटातील तब्बल 13 ते 14 आमदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, असा मोठा दावा केला आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतर आता ‘ऑपरेशन टायगर…

Read More

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई:चाकणमध्ये पहाटे 4 वाजता 57 लाखांचा मुद्देमाल जप्त, 83 किलो गांजासह दोघे गजाआड

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने (गुन्हे शाखा) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल 83 किलो 960 ग्रॅम गांजा, एक स्कॉर्पिओ गाडी, तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 57 लाख 73 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त…

Read More

आमचे खासदार फुटले नाहीत, विकले गेले:भाजपमध्ये सर्व मावशा आहेत; महाजनांच्या अनेक भानगडी.. तर तेच पहिले पक्ष सोडतील- संजय राऊत

आमच्या हातात ईडी, सीबीआय मिळू द्या भाजपचे महाराष्ट्रात 7 तुकडे होतील. त्यामध्ये सर्वांत आधी गिरीश महाजन पक्ष सोडतील, इतक्या त्यांच्या भानगडी आहेत. ओमराजे निंबाळकर यांना पक्षाने आमदार-खासदार केले त्यांच्यासाठी वेळ काढावा लागतो, कोर्ट काही घरात किंवा पुण्यात नाही, ओमराजेंनी आम्हाला शिकवू नये. संजय दिना पाटील हे शिवसेनेमुळेच जिंकले आहेत, त्यांना जाण्याचे काहीच कारण नव्हते, त्यांच्या…

Read More