सातारा गुन्हेगारी वृत्त:भरधाव दुचाकी घसरल्याने चालकाचा मृत्यू; माहुलीत युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण
सातारा तालुक्यातील वासोळे गावाजवळ झालेल्या अपघातात प्रीतम मल्हारी बनसोडे (वय ३६, रा. निगडी, पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २५ मे रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास सातारा-वाठार मार्गावर वासोळे कमानीजवळ त्यांची दुचाकी भरधाव वेगात असताना नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला साचलेल्या मुरुमाच्या ढिगाऱ्यावर दुचाकी घसरून अपघात झाला. या घटनेत अक्षय सुरेश देखने यांना किरकोळ दुखापत झाली, तर प्रीतम…