![]()
सोशल मीडियावर प्रेक्षकसंख्या आणि आर्थिक फायद्यासाठी महिला तसेच मृतदेहाबद्दल अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह वक्तव्ये करणे स्टँडअप कॉमेडियन्सला चांगलेच भोवले आहे. ‘बिग बॉस’ फेम प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकारावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे स्वैराचारात बदलू नये, असा कडक इशारा दिला आहे. वादावर मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका स्पष्ट
आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीला भारताच्या संविधानाने अभिव्यक्तीचा अधिकार दिला आहे. पण त्याचवेळी अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे स्वैराचारामध्ये बदलू नये, अशी अपेक्षासुद्धा संविधानाने व्यक्त केली आहे. ज्यावेळी समाजाची मर्यादा तोडून आपण अभिव्यक्ती करतो, त्यावेळी संविधानाने इतरांना आदराने राहण्याचे जे स्वातंत्र्य दिले आहे, त्यावर आपण थेट अतिक्रमण करतो.” फडणवीस पुढे म्हणाले, मी स्वतः स्टँडअप कॉमेडी मोठ्या प्रमाणात ऐकतो आणि पाहतो. ते मनोरंजनाचे एक उत्तम साधन आहे, यात शंका नाही. स्टँडअप कॉमेडियन्सला नक्कीच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण ते करत असताना सामाजिक मर्यादा काय आहेत, याचे भान ठेवले पाहिजे. समाजातील इतर लोकांच्या आदरपूर्वक जगण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीही अतिक्रमण करू नये, अशी माझी स्पष्ट अपेक्षा आहे. नेमकं काय आहे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रणित मोरेच्या शोमधील काही व्हिडिओ क्लिप्स तुफान व्हायरल होत आहेत. यातील एका क्लिपमध्ये कॉमेडियन हिमांशू जांगडा याने एका डेटचा उल्लेख करताना, मुलीवर ३७० रुपयांची बिर्याणी खर्च केली, तर तिच्याकडून ती वसुली (शारीरिक जवळीक) करण्याचा अधिकार पुरुषाला आहे, अशा आशयाची अत्यंत मानहानीकारक आणि अश्लील टिप्पणी केली होती. या वक्तव्यामुळे महिलांच्या संमती आणि प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवल्याचा आरोप होत असून, देशभरातून यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यासोबतच, याच कार्यक्रमाशी संबंधित दुसऱ्या एका क्लिपमध्ये डॉ. सेजल पवार हीने शैक्षणिक उद्देशासाठी वापरल्या जाणाऱ्या मृत पुरुषांविषयी अत्यंत अश्लील आणि अपमानजनक टिप्पणी केल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र सायबर ॲक्शन मोडमध्ये; समन्स जारी
महाराष्ट्र सायबर सेलने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तपासादरम्यान हे स्पष्ट झाले आहे की, केवळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर व्ह्यूज वाढवण्यासाठी, लोकांचा सहभाग खेचण्यासाठी आणि व्यावसायिक/आर्थिक फायद्यासाठी हा सामाजिक संकेत आणि मर्यादा ओलांडणारा मजकूर जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून, तिघांनाही चौकशीसाठी आणि जबाब नोंदवण्यासाठी सायबर कार्यालयासमोर हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. इंटरनेटवर संमिश्र प्रतिक्रिया तरुणावरील कारवाईनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा दोन गट पडले आहेत. त्यात एका गटाने या कारवाईचे समर्थन केले. बहुतांश नेटकऱ्यांनी कंपनीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. लोकांच्या मते, “मुलींबद्दल अशी विकृत आणि अश्लील मानसिकता ठेवणाऱ्यांना असा धडा मिळणे गरजेचे होते, जेणेकरून भविष्यात कोणीही असे वक्तव्य करण्याचे धाडस करणार नाही.” काही लोकांनी असेही म्हटले की, ‘केवळ एका कॉमेडी शोमध्ये केलेल्या विधानामुळे किंवा चुकीच्या वक्तव्यामुळे एखाद्याची नोकरी घालवणे आणि त्याला उघड्यावर पाडणे जरा अतिरेकी ठरले.’ मुंबई पोलिसांची पोस्ट प्रणित मोरे आणि ₹३७० ची बिर्याणी या वादाचे पडसाद आता थेट मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया पेजवर उमटले आहेत. जनजागृती करण्यासाठी नेहमीच धारदार, समकालीन आणि विनोदी पोस्ट टाकण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई पोलिसांनी या ‘सहमती’च्या वादावर इन्स्टाग्रामवर एक कडक पोस्ट शेअर केली, जी अल्पावधीतच व्हायरल झाली. या पोस्टमध्ये एक स्वच्छ पांढरा ग्राफिक फोटो होता, ज्यावर मोठ्या अक्षरात ₹३७० लिहिले होते आणि ‘०’ च्या जागी बिर्याणीची प्लेट दाखवण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी या चित्रावर लिहिले, “तुम्हाला ₹३७० मध्ये बिर्याणीची प्लेट मिळते. आमच्या लॉक-अपमध्ये जास्त वेळ घालवल्यास मोफत जेवण मिळते.” पोस्टच्या शेवटी पोलिसांनी #BiryaniIsNotConsent (बिर्याणी म्हणजे सहमती नव्हे) हा हॅशटॅग देखील वापरला. काहींनी या पोस्टकडे विनोदी अंगाने पाहिले, तर काही युजर्स यामुळे पोलिसांवर संतापले देखील. प्रणित मोरेला सलमान खाननेही दिला होता इशारा स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या त्याच्या शोमधील ‘370 रुपयांची बिर्याणी’ आणि महिलांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पण, त्याच्या या बेजबाबदार वागणुकीचा हा पहिलाच प्रसंग नाही. याआधी ‘बिग बॉस 19’ मध्ये बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याने त्याला त्याच्या या उथळपणाबद्दल कडक शब्दांत ताकीद दिली होती. प्रणित मोरेच्या बोलण्याच्या पद्धतीवर आणि पोरकटपणावर सलमान खानने त्याला ‘विकेंड का वार’मध्ये चांगलेच सुनावले होते. सलमानने त्याला स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, अशा प्रकारची वर्तणूक त्याला महागात पडू शकते. ‘बिर्याणी म्हणजे सहमती नव्हे!’:370 रुपयांच्या बिर्याणीवरून प्रणित मोरेची माफी, तरुण नोकरीवरून बडतर्फ, मुंबई पोलिस-झोमॅटोही मैदानात, वाचा पूर्ण स्टोरी विनोदवीर प्रणीत मोरे याच्या स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये ३७० रुपयांच्या चिकन बिर्याणीवरून महिलांबद्दल अश्लील आणि अक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तरुणाला मोठा फटका बसला आहे. सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त झाल्यानंतर, या तरुणाला त्याच्या कंपनीने नोकरीवरून काढून टाकले आहे. सोशल मीडियावरील ‘हक्क गाजवण्याची’ आणि व्यावहारिक मानसिकतेची ही चर्चा आता केवळ एका व्हिडिओपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर त्या तरुणाला याचे थेट व्यावसायिक परिणाम भोगावे लागले आहेत. विशेष म्हणजे या मानसिकतेवर जनसामान्यांतूनही प्रचंड चीड व्यक्त करण्यात येतेय. सविस्तर वाचा
Source link
370 रुपयांची बिर्याणी अन् अश्लील टिप्पण्या भोवल्या:कॉमेडियन प्रणित मोरेसह तिघांवर गुन्हा; वादावरुन मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा