Headlines

भारतीय संस्कृतीची मूल्ये जपणे काळाची गरज:उद्योजक अभय फिरोदिया यांचे प्रतिपादन, ज्ञान-परंपरेचा मिलाफ महत्त्वाचा

भारतीय संस्कृतीमधील मूल्ये म्हणजे जीवनाचे तत्वज्ञान असून ती जपणे सध्याच्या काळाची गरज आहे, असे मत फोर्स मोटर लि. चे चेअरमन आणि जागतिक किर्तीचे उद्योगपती अभय फिरोदिया यांनी व्यक्त केले. पुण्यभूषण फौंडेशनतर्फे आयोजित एका विशेष वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यंदाच्या पुण्यभूषण पुरस्काराचे मानकरी असलेल्या ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांच्यासोबत पत्रकारांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…

Read More

बुलढाण्यात मियावाकी प्रकल्पाला भीषण आग:5 वर्षांची मेहनत क्षणात भस्मसात, सिंदखेड लपाली शिवारातील हजारो झाडे जळून खाक

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली शिवारात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या मियावाकी प्रकल्पाला भीषण आग लागल्याने हजारो झाडे जळून खाक झाली आहेत. ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून आकारास आलेल्या या हरित उपक्रमाचे आगीमुळे मोठे नुकसान झाले असून, डोळ्यांदेखत हा प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी उभा राहिलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प…

Read More

Nasrapur Minor Rape Murder Accused Gets Police Custody Till May 7

भोर तालुक्यातील नसरापूर येथील चार वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला पुणे न्यायालयाने ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान . पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला “काही तक्रार आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने अत्यंत…

Read More

ताडोबा जनगणनेत 42 वाघ, 13 बिबट्यांची नोंद:5 हजार 765 वन्यजीव दर्शनांनी ताडोबा-अंधारी व्याघ्र अभयारण्याची समृद्धी स्पष्ट

ताडोबा-अंधारी व्याघ्र अभयारण्यात नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक मचान जनगणनेत वन्यजीव समृद्धीचे प्रभावी चित्र समोर आले आहे. बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला झालेल्या या उपक्रमात तब्बल ५,७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद झाली. यामध्ये ४२ वाघ आणि १३ बिबट्यांचे दर्शन विशेष ठरले. कडक उन्हाळ्यात पाणवठ्यांवर एकत्र येणाऱ्या वन्यजीवांचे निरीक्षण करून त्यांच्या संख्येचे मूल्यांकन करण्यासाठी ही जनगणना केली जाते. या उपक्रमात…

Read More

माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नये:नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचे राजकारण्यांना आवाहन; नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी

नसरापूर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी नसरापूरला धाव घेत आहेत. मात्र, “जोपर्यंत माझ्या चिमुकलीला न्याय मिळत नाही आणि त्या नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या घरी येऊ नये,” असे कळकळीचे आवाहन पीडितेच्या वडिलांनी केले आहे. देहू…

Read More

संगमनेरशहराच्या विकासाचा १०० दिवसांच्या कामांचा लेखाजोखा:महिला सुरक्षा दल ठरले राज्यासाठी मॉडेल; तक्रार निवारण ॲपद्वारे ३१७ प्रश्न मार्गी‎

प्रतिनिधी |संगमनेर नगरपरिषदेच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत नक्की काय बदल झाले? याचा लेखाजोखा सेवा समितीचे प्रमुख आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत मांडला. ‘संगमनेर २.०’ या संकल्पनेतून शहराचा शाश्वत विकास करतानाच, प्रशासकीय मरगळ झटकून ३९ विभागनिहाय बैठकांद्वारे कामांना गती देण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर…

Read More

भारतीय परंपरा, संस्कृतीवर परदेशी पाहुणे फिदा:बेलापूरच्या देसाई परिवारातील विवाहासाठी इंग्लंडचे ५ नागरिक श्रीरामपुरात

प्रतिनिधी |श्रीरामपूर भारतीय संस्कृतीतील विवाह सोहळा म्हणजे केवळ दोन व्यक्तींचे मिलन नसून तो एक उत्सवाचा सोहळा असतो, याची प्रचिती बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथे आली. पत्रकार देविदास देसाई यांचा पुतण्या सागर याच्या विवाहानिमित्त थेट इंग्लंडहून ऑर्थर, जोंनथन, अलेक्स, लिडीया आणि अमेलिया हे पाच पाहुणे खास उपस्थित राहिले. भारतीय विवाह सोहळ्यातील कौटुंबिक जिव्हाळा आणि रितीरिवाज पाहून हे…

Read More

शेतमजुरी; स्वत:च स्वयंपाक करत किशोरचे बारावीत यश:आजारी आईची सेवा; न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची यशोगाथा‎

प्रतिनिधी | अकोला घरची आर्थिक परिस्थिती बेताची…केवळ दीड एकर शेती…वडिलही इतरत्र काम करतात,भाऊ खासगी क्षेत्रात नौकरीला…महाविद्या लयाला सुट्टी असलेल्या दिवशी स्वत:ही शेत मजुरी केली, आजारी आईची सेवा केली, एक वेळचा स्वयंपाक स्वत:च केला, अशा विपरीत परिस्थितीशी दोन हात करीत वर्षभर नियमित अभ्यास केला अन् बारावीत वाणिज्य शाखेतून प्रथम येत अथक परिश्रमाने शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा…

Read More

नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा:'शीरखूर्मा'तून गुंगीचे औषध देऊन पीडितांचे लैंगिक शोषण?; तपास यंत्रणांचा संशय

नाशिक येथील नामांकित आयटी कंपनी ‘टीसीएस’मधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, पीडित तरुणींना ‘शीरखुर्मा’ सारख्या गोड पदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा दाट संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित…

Read More

‘जय गुरुदेव’चा जयघोष; दिव्यांनी उजळून निघाले यावली शहीद गाव:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मोत्सव सोहळा, मान्यवरांची हाेती उपस्थिती‎

प्रतिनिधी | अमरावती नजिकच्या यावली शहीद येथे अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यांची जन्मभूमी या गावात भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जय गुरुदेव चा निनाद आणि दिव्यांची आरास करण्यात आली. पहाटे ४ वाजता पासून राष्ट्रसंत जन्मावतरण व पुष्पांजली सोहळा कार्यक्रम गुरुकुंज येथील गोपाल सालोटकर व संच यांच्या सादरीकरणाने साजरा झाला….

Read More