Headlines

कोकणातील शेतकऱ्यांना दिली बोगस खते, कीटकनाशके:कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची राजू शेट्टींची कृषी आयुक्तांकडे मागणी

माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथे कृषी आयुक्तांची भेट घेऊन बोगस आणि निकृष्ट खते व कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे या निकृष्ट उत्पादनांमुळे मोठे नुकसान झाले असून, त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. चालू वर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आंबा…

Read More

वयोवृद्धाचा खून करून जबरी चोरी, दोन आरोपींना अटक:पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई, 5 गंभीर गुन्हे उघडकीस

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी एका वयोवृद्ध व्यक्तीच्या खून आणि जबरी चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे खून, दरोडा आणि जबरी चोरीचे एकूण पाच गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. मंचर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दामोदर जयराम मिंडे (वय ६२, रा. थोरांदळे पाईनमळा, ता. आंबेगाव,…

Read More

सुनेत्रा पवारांच्या आग्रहामुळेच काँग्रेसची बारामतीतून माघार:हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका

राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, निवडणुकीतून माघार घेतली असली तरी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे या निर्णयानंतरही राजकीय समीकरणांमध्ये अनिश्चितता कायम असल्याचे दिसून येत आहे. सपकाळ यांनी…

Read More

युद्धाच्या छायेतही भारताचा पुरवठा सुरक्षित:15,400 टन एलपीजीसह ग्रीन आशा जहाजाचे जेएनपीएमध्ये आगमन; तणावात मोठी कामगिरी

आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक घडामोड समोर आली आहे. ‘ग्रीन आशा’ नावाचे भारताच्या ध्वजाखालील एलपीजी वाहतूक करणारे जहाज सुरक्षितपणे जेएनपीए बंदरात दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यानंतर या मार्गाने पोहोचलेले हे पहिले जहाज ठरले आहे. त्यामुळे या घटनेला मोठे सामरिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले…

Read More

28 वा कलाश्री संगीत महोत्सव उत्साहात पडला पार:पिंपळेगुरव येथे घराणेदार गायकांच्या मैफलीने समारोप

गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने आयोजित २८ वा कलाश्री संगीत महोत्सव नुकताच पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात दिमाखात संपन्न झाला. घराणेदार गायक कलाकारांच्या मैफलीने या महोत्सवाचा समारोप झाला. महोत्सवाच्या उद्घाटनाला आमदार शंकरभाऊ जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत शितोळे, चंद्ररंग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य लक्ष्मण जगताप, उद्योजक विजू शेठ जगताप, गुरुकुल कलाश्री संगीत…

Read More

मलाड दिंडोशी दंगलप्रकरणी मोठी कारवाई, अवैध बांधकामांवर बुलडोजर:दंगल, ड्रग्स आणि दहशत; प्रशासनाची कडक भूमिका

मुंबईतील मलाड पूर्व भागातील दिंडोशी परिसरात घडलेल्या दंगलप्रकरणी प्रशासनाने कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. संतोष नगर परिसरात झालेल्या या हिंसाचारानंतर संबंधित आरोपींच्या अवैध बांधकामांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बुलडोजर चालवण्यात आला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली…

Read More

वीज कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांची 10 लाखांची फसवणूक:एपीके फाईल पाठवून काढले खात्यातील पैसे, हिंगोली पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई महानगर गॅस पाईपलाईनचे पैसे थकीत असून तातडीने पैसे भरा असा संदेश देत एपीके फाईल पाठवून विज कंपनीच्या अधिक्षक अभियंत्याच्या खात्यातील १० लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ९ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या भामट्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील विज…

Read More

हिंगोली शहरात 4.97 लाखांचा गुटखा जप्त:तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली शहरातील पेन्शन पुरा भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी तारीख 9 एका घरावर टाकलेल्या छाप्यात 4 लाख 97 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हिंगोली शहरासह जिल्हाभरामध्ये मटका, जुगारअड्डे, गुटखा…

Read More

साई संस्थान कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट:चार्जशीटमधून नाव वगळलं, तरी अशोक खरात पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात

शिर्डीतील साई संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या 2022 मधील मृत्यू प्रकरणात आता मोठी घडामोड घडली आहे. राहाता न्यायालयाने या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करण्याचे आदेश दिल्याने संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. याआधी तपासादरम्यान पुरावे अपुरे असल्याचे कारण देत अशोक खरात यांचे नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आले होते. मात्र, आता न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्या भूमिकेचा पुन्हा सखोल…

Read More

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार:सुनील तटकरेंनी मानले आभार, म्हणाले – त्यांनी सामंजस्यपणा दाखवला

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत अखेर मोठा पेच सुटला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या काँग्रेसने अखेर या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले आहे. तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानताना जुन्या राजकीय स्मृतींना उजाळा दिला. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती…

Read More